Ashadhi Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग! 'या' राशींवर बरसणार विठुरायाची कृपा

Ashadhi Ekadashi 2024 : आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आहे. आजपासून 4 महिन्यांपासून भगवान विष्णू झोपी जाणार. आज आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग जुळून आला आहे. या योगांमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. 

| Jul 17, 2024, 01:12 AM IST
1/7

आषाढी एकादशीला त्रिग्रही योगासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग, शुक्ल योग, बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग आहे. त्यामुळे काही राशींवर आषाढी एकादशीला विठुरायांची कृपा बरसणार आहे. 

2/7

तूळ

करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. खर्चात कपात होणार आहे. सकारात्मक विचाराने करिअरमध्ये पुढे जाणार आहात. वडिलांसोबतच्या नात्यात आनंद असणार आहे. 

3/7

कर्क

नोकरदारांना प्रगतीच्या नवीन संधी खुल्या होणार आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. प्रेमसंबंधात गोडवा असणार आहे. 

4/7

मेष

आषाढी एकादशी तुम्हाला करिअरमध्ये प्रगती घेऊन आला आहे. आर्थिक लाभ सह तुमचा खर्चही वाढणार आहे. सकारात्मक विचार ठेवा तुम्हाला फायदा देणार आहे. 

5/7

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी आषाढी एकादशी खूप फायदेशीर ठरणार आहे . तुमच्या जुन्या समस्या दूर होणार आहे. प्रेम प्रकरणांबद्दल बोलायचं झालं तर या काळात तुमच्या नात्यात सुधारणा होणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. इच्छित पद आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे.

6/7

सिंह

या राशीच्या लोकांना देवशयनी एकादशी लाभदायक ठरणार आहे. तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे. या काळात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील आणि यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

7/7

कन्या

या राशीच्या लोकांना देवशयनी एकादशीला विशेष लाभदायक ठरणार आहे. या दिवशी तुम्हाला बढती मिळणार आहे. या काळात तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)