कोण आहे निकिता गांधी? जिच्या कॉन्सर्टपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत चौघांचा मृत्यू

Nikita Gandhi: 'जग्गा जासूस' चित्रपटात तिने अरिजित सिंगसोबत 'उल्लू का पट्टा' हे गाणे गायले होते जे खूप गाजले.

| Nov 26, 2023, 06:54 AM IST

Nikita Gandhi Concert: या दुर्घटनेत 2 पुरुष आणि 2 महिला विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. त्यांच्यावर कलामासेरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि इतर काही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

1/8

कोण आहे निकिता गांधी?, जिच्या कॉन्सर्टपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत चौघांचा मृत्यू

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

Nikita Gandhi Concert: शनिवारी रात्री केरळमधील कोची येथील कोचीन विद्यापीठाच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान गायिका निकिता गांधीच्या मैफिलीपूर्वी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक जखमी झाले.

2/8

60 हून अधिक लोक जखमी

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

या दुर्घटनेत 2 पुरुष आणि 2 महिला विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. त्यांच्यावर कलामासेरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि इतर काही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आणखी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

3/8

चेंगराचेंगरी कशी झाली?

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने प्रेक्षक पायऱ्यांचा वापर करून सभागृहात पोहोचले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) एमआर अजित कुमार यांनी दिली. प्रेक्षागृह अर्धवट भरले होते पण अचानक पाऊस आल्याने विद्यार्थी पायऱ्यांवरून पळू लागले, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

4/8

कॉन्सर्टदरम्यान चेंगराचेंगरी

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

निकिता गांधीच्या कॉन्सर्टदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान घटना घडली तेव्हा निकिताने कॉन्सर्ट सुरू केले नव्हते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. निकिता गांधी ही कोचीन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CUSAT) च्या खुल्या सभागृहात आयोजित संगीत महोत्सवात कॉन्सर्ट करणार होती. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

5/8

कोण आहे निकिता गांधी?

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

32 वर्षीय निकिता गांधी ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. तिने हिंदी, तामिळ, तेलगू, बंगाली आणि कन्नड अशा पाच वेगवेगळ्या भाषांमधील भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'राबता' चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भूमिकेसाठी निकिताने 'राबता' हे गाणे गायले आहे.

6/8

अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

'जग्गा जासूस' चित्रपटात तिने अरिजित सिंगसोबत 'उल्लू का पट्टा' हे गाणे गायले होते जे खूप गाजले. निकिता गांधी यांनी 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स', 'जब हॅरी मेट सेजल', 'केदारनाथ', 'लुका छुपी', 'सूर्यवंशी' आणि 'टायगर 3' यासह अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

7/8

'जुगनू' हे गाणे व्हायरल

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

तिने 'लियो', 'वारीसु', 'कॉकपिट' आणि 'किश्मिश' यांसारख्या चित्रपटांसाठी बंगाली आणि तमिळ गाणीही गायली आहेत. तिची 'आओ कभी हवेली पे' आणि 'पोस्टर लगवा दो' ही गाणी खूप पसंत केली जातात. तिचे बादशाहसोबतचे 'जुगनू' हे गाणे व्हायरल हिट ठरले आहे.

8/8

चेन्नईत शिक्षण

Who is Nikita Gandhi whose pre concert Cusat University Stampede killed four

निकिता अर्धी बंगाली आणि अर्धी पंजाबी आहे. पदवीच्या शिक्षणादरम्यान ती चेन्नईमध्ये राहात होती. तिने सुमारे 12 वर्षे ओडिसी नृत्य आणि हिंदुस्थानी संगीत शिकले. निकिता गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1991 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे एका मिश्र बंगाली आणि पंजाबी कुटुंबात झाला.