Who Is Shantanu Naidu : हा तरुण आहे, रतन टाटांचा Best Friend; त्याच्या नावे कमी वयातच मोठी कर्तबगारी

Who Is Shantanu Naidu : ज्याच्याकडून रतन टाटाही खूप काही शिकतात, अशा शंतनु नायडू बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

Aug 17, 2022, 14:41 PM IST

Who Is Shantanu Naidu : देशातील लोकप्रिय उद्योजक रतन टाटा यांच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये रतन टाटांसोबत असलेल्या मुलाबद्दल साऱ्यांनाच कुतूहल वाटलं होतं. रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती म्हणजे नक्कीच त्यांच्या जवळच्यांपैकी एक असेल. रतन टाटा यांच्यासोबत आधी देखील या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुलगा नेमका कोण? रतन टाटा यांच्यापर्यंत तो कसा पोहोचला? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

1/7

Who Is Shantanu Naidu

शंतनु नायडू हा एक बिझनेसमन, इंजिनिअर, सोशल मीडिया इंफ्लूयंसर, लेखक आणि इंटरप्रेन्योर आहे. मंगळवारी, रतन टाटा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा देणाऱ्या गुडफेलोजमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा समूहातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रतन टाटा या स्टार्टअपमध्ये सक्रिय सहभाग घेतात. या गुंतवणूक कंपनीची स्थापना शंतनु नायडूने केलीये. 

2/7

Ratan Tata Assistant Shantanu Naidu

शंतनू नायडू आणि रतन टाटा हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात. मागच्या वर्षी 28 डिसेंबरला रतन टाटा यांनी शंतनू नायडूसोबत त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला.

3/7

Shantanu Naidu Education

शंतनू नायडू हा तरुण वयात तिथे पोहोचला आहे, जे कित्तेक उद्योग क्षेत्रातल्या लोकांचं स्वप्न आहे.

4/7

Ratan Tata Assistant Shantanu Naidu

शांतनु नायडू का जन्म महाराष्ट्र के पुणे में 1993 में हुआ था और टाटा ग्रुप में काम करने वाले वो अपने परिवार की 5वीं पीढ़ी हैं. शंतनु नायडूचा जन्म 1993 मध्ये पुण्याला झाला होता. टाटा ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कुटुंबातली ती 5 वी पिढी आहे.

5/7

Shantanu Naidu Education

शंतनुने 2016 ला न्यूयॉर्कच्या कॉर्नेल यूनिव्हरसिटीतून MBA चं शिक्षण घेतलं आहे. 2018 ला भारतात येऊन टाटा ट्रस्टच्या चेअरमन ऑफिसमध्ये डेप्यूटी जनरल मॅनेजर म्हणून काम काम सुरु केलं. शंतनु नायडूच्या LinkedIn प्रोफाईलनुसार तो  2014 च्या सप्टेंबर महिन्यापासून टाटा ट्रस्टसोबत काम करत आहे.

6/7

Shantanu Naidu Salary

मीडिया रिपोर्टनुसार, शंतनु नायडूचा वार्षिक पगार 27 लाखांच्या जवळपास आहे.

7/7

Shantanu Naidu net worth

एका रिपोर्टनुसार, शंतनु नायडूची नेट वर्थ साधारण 5 ते 6 कोटी रुपये आहे.