PHOTOS: कोण आहे युवराजसह भल्या-भल्यांच्या रेकॉर्डचा धुव्वा उडवणारा नेपाळी बॅट्समन?

नेपाळ क्रिकेट संघाचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे.

Sep 27, 2023, 16:00 PM IST

नेपाळ क्रिकेट संघाचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे.

 

1/8

नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.  

2/8

दीपेंद्रने आशियाई खेळ २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि १० चेंडूत ५२* धावा केल्या.  

3/8

कोण आहे दीपेंद्र?

दीपेंद्र सिंग ऐरी २३ वर्षांचा आहे. त्याचा जन्म 24 जानेवारी 2000 रोजी झाला होता. तो नेपाळच्या संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो.  

4/8

त्याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी केनियाविरुद्ध नेपाळच्या  वरिष्ठ संघातून पदार्पण केले. पण नेपाळला 2018 मध्ये वनडे खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर तो मुख्य संघाचा भाग बनला.  

5/8

वरिष्ठ संघात पदार्पण करण्यापूर्वी दीपेंद्रने २०१६ मध्ये अंडर-१९ विश्वचषक खेळला होता.  

6/8

दीपेंद्र नेहमीच पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही तो चपळ आहे.  

7/8

दीपेंद्रने आतापर्यंत 52 एकदिवसीय आणि 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.याशिवाय, दीपेंद्रने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 40 डावांमध्ये 37.25 च्या सरासरीने आणि 136.84 च्या स्ट्राइक रेटने 1155 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. 

8/8

गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात 36 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत.