नावातून 's' काढल्याने 3.56 लाखांचा गंड; तुम्ही सुद्धा करता का ही चूक? वेळीच सावध व्हा

Fraud After Removing Letter S: जागतिक आरोग्य संघटनेमध्ये काम केलेल्या एक निवृत्त आरोग्य अधिकारी एका वेगळ्याच फसवणुकीला बळी पडला आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. याच माध्यमातून त्यांनी या अधिकाऱ्याला 3.56 लाखांचा गंडा घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ एका अक्षरामुळे हा फटका या व्यक्तीला बसलाय. नक्की घडलं काय पाहूयात...

| Aug 06, 2023, 16:41 PM IST
1/7

Fraud After Removing Letter S

आपल्या मित्राचा ईमेल आयडी आहे असं समजून केलेल्या एका रिप्लायमुळे या निवृत्त अधिकाऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचं वय 78 वर्ष आहे.

2/7

Fraud After Removing Letter S

या व्यक्तीला johnpmeneze@gmail.com अकाऊंटवरुन एक ई-मेल आला. हा आपल्या मित्राचा ईमेल आयडी आहे असं या व्यक्तीला वाटलं. या अधिकाऱ्याच्या मित्राचा ई-मेल आयडी johnpmenezes@gmail.com असा आहे. दोन्ही ई-मेल आयडीमध्ये केवळ शेवटच्या एका अक्षराचा म्हणजेच s चा फरक आहे. 

3/7

Fraud After Removing Letter S

या फेक इमेल आयडीवरुन आलेल्या ई-मेलमध्ये मित्राने आपल्याला नातू झाल्याचं सांगितलं. त्यावर या अधिकाऱ्याने रिप्लाय करुन शुभेच्छा दिल्या. नंतर याच ई-मेलवरुन अन्य एक मेल या अधिकाऱ्याला आला. यामध्ये आर्थिक मदत मागण्यात आली.

4/7

Fraud After Removing Letter S

लंडनवरुन भारतात येणारं माझ्या मुलाचं नियोजित विमान त्याला पकडता आलं नाही. तसेच त्याच्या पत्नीची प्रकृतीही चिंताजनक आहे. त्यामुळेच आपल्याला काही पैशांची गरज आहे, असं या ई-मेलमध्ये सांगण्यात आलं.

5/7

Fraud After Removing Letter S

मदत म्हणून हव्या असलेल्य पैशांमधून तिकीट बूक करता येईल असं या फेक ई-मेलमध्ये म्हटलं होतं. खरोखरच मित्राला पैशांची गरज आहे असं समजून या अधिकाऱ्याने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला.

6/7

Fraud After Removing Letter S

या अधिकाऱ्याने 26 जुलै ते 31 जुलैदरम्यान एकूण 3.56 लाख रुपयांचा निधी ट्रान्सफर केला. ही रक्कम या व्यक्तीने कोटक महिंद्राच्या खात्यावरुन ट्रान्सफर केली होती. याचा उल्लेख या व्यक्तीने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सायबर गुन्ह्यांअंतर्गत तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.

7/7

Fraud After Removing Letter S

पुण्यातही काही दिवसांपूर्वी अशाच एका ऑनलाइन फसवणुकीमध्ये ई-मेलवरुन 22 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. पुण्यातील एका कंपनीला फ्रान्समधील कंपनीने 51 हजार युरोंची ऑर्डर दिल्याचा मेल पाठवण्यात आला होता. त्याच माध्यमातून ही फसवणूक झालेली.