फायनलमध्ये विकेटकिपिंग कोण करणार? Ishan Kishan की KS Bharat? हरभजनने घेतलं तिसरंच नाव, म्हणाला...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 04, 2023, 00:49 AM IST

WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

1/5

इशान किशन की केएस भरत?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात विकेटकिपिंग कोण करणार? इशान किशन की केएस भरत? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर हरभजन सिंह याने भाष्य केलंय.

2/5

रिद्धिमान साहा

किशन प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा, असं मला वाटत नाही. कारण केएस भरत गेल्या काही काळापासून भारताकडून सतत खेळत आहे. रिद्धिमान साहा असता तर मी त्याला संघात स्थान दिलं असतं, असं हरभजन सिंह म्हणाला आहे.

3/5

केएस भरत

केएस भरत याच्याकडे अधिक अनुभव आहे आणि तो एक चांगला किपर आहे. जर केएल राहुल तंदुरुस्त असता तर त्याला केएस भरतच्या जागी स्थान देण्यात आलं असतं, असंही हरभजन म्हणाला आहे. 

4/5

केएस भरत

मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत केएस भरतने पदार्पण केलं होतं. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भरतला केवळ 101 धावा करता आल्या होत्या.

5/5

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम (WTC Final 2023) सामन्यासाठी आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.