महात्मा गांधी यांच्या आधी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो होता?

भारतात चलनात असलेल्या सर्व नोटांवर महात्मा गांधी यांचे फोटो आहेत. मात्र, महात्मा गांधी यांच्या फोटोआधी कुणाचा फोटो होता जाणून घेवूया. 

Oct 02, 2023, 16:03 PM IST

Indian Rupee : भारतीय चलन अर्थात भारतीय नोटांवर  महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र, महात्मा गांधी यांच्या आधी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो होता? सर्वप्रथम केव्हा भारतीय नोटांची छपाई झाली. महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटा कधी चलनात आल्या जाणून घेवूया. 

1/7

सध्या भारतात चलनाथ असलेल्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो पहायला मिळतो.   

2/7

 नोटांची सुरक्षितता लक्षात घेत 1990 च्या दशकात कायमस्वरुपी महात्मा गांधी यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेत अत्यंत महत्वाचे बदल देखील करण्यात आले. 

3/7

1950 मध्ये राष्ट्रीय प्रतिक असलेले अशोकस्तंभाचे छायाचित्र छापण्यात आले. यानंतर 1980 मध्ये देशात क्रांती घडत गेली तसे आर्यभट्ट सॅटेलाइट, शेतीची सामग्री अशा प्रकारचे छायचित्र छापले जाऊ लागले.  

4/7

भारत सरकारने 1949 मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली. या नोटेवर किंग जॉर्जच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभाचे छायाचित्र छापण्यात आले.  

5/7

भारत देश स्वातंत्र झाल्यानंतर  आरबीआयने भारतात नोटांची छपाई सुरु ठेवली होती. या नोटांवर किंग जॉर्ज चौथ्याचे चित्र छापलेले होते.

6/7

आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर एलके झा यांची स्वाक्षरी असलेल्या नोटेवर महात्मा गांधी आणि सेवाग्राम आश्रमा फोटो होता. यानंतर 1987 मध्ये 500 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. या नोटांवर देखील महात्मा गांधी यांचे छायाचित्र होते. 

7/7

2 ऑक्टोबर 1969 रोजी महात्मा गांधींची 100 वी जयंती साजरी झाली. या दिवशी पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा फोटो असलेली नोट चलनात आली.