'हिट गर्ल' या दिग्दर्शकाच्या प्रेमात राहिली आयुष्यभर अविवाहित, भीतीपोटी घरात होत्या कैद

Entertainment News : फोटोमधील चिमुकलीचा आज वाढदिवस आहे. तिच्या काळात सर्वात यशस्वी नायिका म्हणून ती प्रसिद्ध होती. तिला हिट गर्ल म्हणून ओखळलं जातं.

Oct 02, 2023, 14:59 PM IST

Happy Birthday Asha Parekh : हिट गर्ल नावाने ओळखली जाणारी अभिनेत्रीचा चित्रपट 25 आठवडे ते 50 आठवडे चित्रपटगृहात चालणार हे ठरलं होतं. त्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेता एका पायावर तयार असायचा. तिच्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. 

1/10

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तिचा जन्म गुजराती हिंदू वडील आणि मुस्लिम आईच्या पोटी झाला. दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांनी तिला स्टेजवर नाचताना पाहिले आणि बाप बेटी  (1954) चित्रपटात कास्ट केलं. तसं तर या चिमुकलीने 1952 मध्ये 'आसमान' (1952) या चित्रपटात काम केलं होतं.

2/10

या अभिनेत्री आहेत आशा पारेख. आज त्यांच्या जन्मदिवस आहे. चित्रपटांची सिल्व्हर, गोल्डन आणि प्लॅटिनम ज्युबिली त्यांनी साजरी केली आहे. आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 95 चित्रपटांमध्ये काम केलंय. 

3/10

आशा पारेख यांचे चित्रपट जितकं दमदार होतं, तितकंच त्यांचं खाजगी आयुष्यात खूप चढ उतार होते. त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. 

4/10

आशा पारेख आणि मनोज कुमार यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आशा पारेख या मनोज कुमार यांच्या राग करायच्या. एकदा चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये मनोज यांनी आशाजींकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यावेळी मनोज अहंकारी आहे असं त्यांचं मत झालं. पण मनोज यांचं चित्रपटातील वलय बघा आशाजींनी त्यांच्यासोबत काम करणं सुरु ठेवलं. 

5/10

मनोज आणि आशा यांच्यामध्ये अनेक वाद व्हाययचे असं मीडिया रिपोर्ट्नुसार सांगण्यात आलं होतं. मनोज यांना आशाजींचं सकाळी उशिरा येणं आवडायचं नाही. तर अभिनेत्रीला मनोज यांचं जास्त टेक घेणं पसंत नव्हतं.  पण साजन चित्रपटानंतर त्यांच्यामधील वाद संपला आणि ते चांगले मित्र झाले. 

6/10

आशाजी कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं. त्या वेळी त्या इतक्या खचल्या की त्या नैराश्याच्या शिकार झाल्या. डॉक्टरांच्या मदतीने ते यातून बाहेर आल्यात. 

7/10

एवढंच नाही तर, एकदा आशाताई इतक्या घाबरल्या होत्या की त्यांनी स्वत:ला घरात कैद करुन घेतलं होतं. झालं असं की, एका चाहत्याने त्यांच्या घराबाहेर तळ ठोकला होता. आशाजींनी लग्न करावं म्हणून तो घराबाहेर बसला होता. एवढंच नाही तर शेजारच्या लोकांनी त्याला जायला सांगितलं तर त्यांनी चाकू काढून तमाशा केला. पोलिसांनी त्याला तुरुंगात डांबला, पण तो तुरुगांतूनही आशाजींना पत्र लिहतं होता.

8/10

अभिनय आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या आशा पारेख आजही अविवाहीत आहे. आशाजी चिपत्रट निर्माते नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या. नासिर हे आधीच विवाहित होते. 

9/10

दुसऱ्याचं घर तोडून त्यांना संसार करायचा नव्हता. म्हणून त्यांचं हे प्रेम अधुरं राहिलं. त्यानंतर अरेंज मॅरिजसाठी त्या तयार झाल्या. अमेरिकेतील भारतीय व्यक्तीशी त्यांचं लग्न ठरलं होतं. पण तो व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला सोडायला तयार नव्हता म्हणून आशाजींनी ते लग्न मोडलं. 

10/10

आशाजी दिलीप कुमार यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. एकदा अशी अफवा पसरली की, आशाजी दिलीप कुमार यांना पसंत करत नाहीत, म्हणून त्यांना दिलीप कुमारसोबत काम करायचं नव्हतं. या बातमीनंतर आशाजी खूप संतापल्या होत्या. पण सायरा बानो यांनी सगळे गैरसमज दूर केले.