नवरात्रोत्सव 9 दिवसांचाच का असतो? कारण आहे अगदी खास आणि पटण्याजोगं

नवरात्रीच्या नऊ रात्री खूप खास मानल्या जातात. जाणून घ्या शारदीय नवरात्री 9 दिवस का साजरी केली जाते.

Oct 09, 2023, 16:56 PM IST
नवरात्रीच्या नऊ रात्री खूप खास मानल्या जातात. जाणून घ्या शारदीय नवरात्री 9 दिवस का साजरी केली जाते.
 
1/10

गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्रौत्सवाची लगबग सुरू झाली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते.   

2/10

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना म्हणतात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांशी संबंधित अनेक परंपरा प्रचलित आहेत.  

3/10

लहानपणापासून नवरात्री पाहणाऱ्या आपण सर्वांना नवरात्र का साजरे करतात, ते नऊ दिवसाचेच का असते, वर्षातून कितीवेळा नवरात्र असते, असे अनेक प्रश्न पडलेले असतात.   

4/10

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री ही नवदुर्गेची रूपे आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात या देवींचा जागर केला जातो.  

5/10

या मागील 2 कारणे आहेत पहिले असे की आई दुर्गेचे महिषासुराशी 9 दिवसापर्यंत युद्ध चालले होते आणि 10 व्या दिवशी त्यांनी असुराचं वध केले होते, म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो.  

6/10

रामायणानुसार, याच दिवशी प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे दसरा उत्साहात साजरा केला जातो.  

7/10

चैत्र आणि अश्विनच्या नवरात्राच्या वेळी ऋतूमान बदलते. आपल्या ऋषी-मुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाच्या  काळाला नवरात्र म्हटले.  

8/10

जर का आपण त्या 9 दिवसात म्हणजे वर्षाचे 18 दिवस अन्न त्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहते, असा समज आहे.  

9/10

शास्त्रामध्ये 9 अंकानंतर कोणता अंक नाही. या अंकाला महत्त्वाचे स्थान आहे. ब्रम्हांडामध्ये देखील 9 ग्रह असतात. म्हणून साधना देखील 9 दिवसाची मानतात. नवरात्राच्या या 9 दिवसांमध्ये 7 दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जातो. 8 व्या दिवशी शक्तीची पूजा करतात. 9 व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असतो.  

10/10

पुराणानुसार या 9 दिवसात जे अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करतं, देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करत, त्याचे संकल्प देखील पूर्ण होतात.