भारतीय रेल्वेला 'या' 5 गाड्यांमुळे होते मोठी कमाई, जाणून घ्या

भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया. 

| Oct 09, 2023, 15:44 PM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया. 

1/8

भारतीय रेल्वेला 'या' 5 गाड्यांमुळे होते मोठी कमाई, जाणून घ्या

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

Indian Railways: सर्वात कमी भाडे आणि दूरच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. एसी आणि अप्पर क्लास श्रेणीतील ट्रेनची तिकिटे महाग असते. तसेच रेल्वेची बहुतांश कमाई मालवाहतुकीतून येते. पण याहूनही कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया. 

2/8

रोज 13 हजार 452 पॅसेंजर ट्रेन

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

भारतात दररोज 13 हजार 452 पॅसेंजर ट्रेन चालतात. ज्यात राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, सुपरफास्ट, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. 13 हजारांहून अधिक गाड्यांपैकी फक्त 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेन आहेत.भारतीय रेल्वेने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 गाड्यांची माहिती दिली आहे. तुम्हाला अपेक्षित असलेल्या वंदे भारत ट्रेनचे या यादीत नाव नाही.  सेमी हायस्पीड ट्रेन भाड्याच्या बाबतीत ही सर्वात महाग आहे.

3/8

बंगळूर राजधानी एक्स्प्रेस

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

उत्तर रेल्वेने जारी केलेल्या यादीनुसार, हजरत निजामुद्दीन ते बंगळुरूपर्यंत धावणाऱ्या 22692 बंगळूर राजधानी एक्स्प्रेसने (22692) रेल्वेला सर्वाधिक पैसे कमावून दिले आहेत. 2022-23 या वर्षात एकूण 5 लाख 9 हजार 510 लोकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आणि रेल्वेला प्रवासी भाड्यातून 1,76 कोटी रुपये मिळाले.

4/8

मुंबई राजधानी

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान एक राजधानी एक्सप्रेस चालते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या ट्रेनमधून 4 लाख 85 हजार 794 प्रवाशांनी प्रवास केला. या ट्रेनने पूर्ण वर्षभरात 1,22,84,51,554 रुपयांची कमाई केली. 

5/8

सियालदह राजधानी एक्सप्रेस

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

या यादीत सियालदह राजधानी एक्सप्रेस (12314) आहे. या ट्रेनने याच कालावधीत प्रवासी भाड्यातून 128 कोटी रुपये वसूल केले. ही ट्रेन नवी दिल्ली कोलकाता येथील सियालदहला जाते. 2022-23 या आर्थिक वर्षात 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनने प्रवास केला.

6/8

रेल्वेला एकूण 126 कोटी रुपयांचे उत्पन्न

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

दिब्रुगढ राजधानी एक्स्प्रेस (20504) नवी दिल्ली ते दिब्रुगढ धावते. त्यामुळे रेल्वेला एकूण 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल (12952) राजधानी एक्सप्रेसने 2022-23 मध्ये रेल्वेला एकूण1,22,84, 51,554 रुपये कमावले. या कालावधीत या ट्रेनमधून 4,85,794 प्रवाशांनी प्रवास केला.

7/8

दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

कमाईमुळे दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस (12424) टॉप 5 मध्ये आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात 4,20,215 प्रवाशांनी या ट्रेनने प्रवास केला आणि रेल्वेला यातून 1,16,88,39,769 रुपये भाडे मिळाले. 

8/8

2.40 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

Indian Railways earns big Revenue in these 5 trains

रेल्वेने जारी केलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या अहवालात भारतीय रेल्वेने 2.40 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. कमाईचा सर्वात मोठा भाग मालवाहतुकीतून येतो. त्याच वेळी, प्रवासी भाड्याचे उत्पन्न 63,300 कोटी रुपये होते.