गौतम अदानी का आहेत पावरफुल बिजनेस मॅन? 10 वर्षात केल्या 'या' 10 गोष्टी

भारतातील एक छोट्याशा शहरात जन्मलेल्या आदानी यांनी संपूर्ण भारतात आपले साम्राज्य उभे केले आहे. अनेक सेक्टरमध्ये अदानी यांनी मोठे यश संपादित केले आहे.   

Jun 26, 2023, 20:47 PM IST

Gautam Adani : यश हे अगदी सहज मिळत नाही. अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. गौतम अदानी... भारतातील श्रीमंत आणि यशस्वी उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी यांचे नवा घेतले जाते. दहा वर्षात गौतम अदानी यांनी खूप मोठे साम्राज्य उभं केल आहे. 10 वर्षात गौतम अदानी यांनी कोणत्या 10 गोष्टी केल्या जाणून घेऊया.

1/10

गेल्या 10 वर्षांत अदानी ग्रुपने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

2/10

पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील जवळीक असल्याचा आरोप विरोधकाकडून केला जात आहे. 

3/10

अदानीच्या ग्रुप भारतातील अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या सहा प्रमुख विमानतळ ऑपरेट करत आहे.  

4/10

देशातील अनेक एअरपोर्ट अदानी ग्रुप ऑपरेट करत आहे. 

5/10

अक्षय ऊर्जेचे महत्त्व ओळखून अदानीने सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी  ग्रीन एनर्जी देणारी कंपनी ठरली आहे. 

6/10

अदानीची प्रमुख कंपनी, APSEZ, भारतातील सर्वात मोठी खाजगी मल्टि-पोर्ट ऑपरेटर बनली आहे.

7/10

अदानी ग्रुपने ऊर्जा, बंदरे, लॉजिस्टिक, कृषी व्यवसाय, रिअल इस्टेट आणि संरक्षण यासह विविध उद्योगांमध्ये आपला व्यवसाय विस्तारला आहे. 

8/10

किराणा माल, खाणी, रेल्वे विमानतळ, बंदरं आणि वीज कंपन्या असा अनेक क्षेत्रात गौतम अदानी यांच्या अगानी ग्रुपचे शेअर्स  आहेत.  

9/10

वडिलांचा पारंपारिक कपडा व्यवसाय न करता हिरे व्यापाऱ्यात नशिब आजमवण्याचा निर्णय अदानी यांनी घेतला आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. 

10/10

24 जून, 1962 रोजी गुजरातमधील छोटाशा खेड्यात अदानी यांचा जन्म झाला.