PARLE-Gची किंमत का नाही वाढत? मग कंपनीला कसा होतो फायदा?

 आजकाल दुधापासून साखरेपर्यंत सर्वाच्या किंमती वाढल्या असताना 25 वर्षात पारलेजी कंपनी आपल्या बिस्किट पुड्यांची किंमत वाढवत नाही, हे कसे शक्य होते?

| Feb 04, 2024, 17:09 PM IST

PARLE-G Biscuits Prices: आजकाल दुधापासून साखरेपर्यंत सर्वाच्या किंमती वाढल्या असताना 25 वर्षात पारलेजी कंपनी आपल्या बिस्किट पुड्यांची किंमत वाढवत नाही, हे कसे शक्य होते?

1/10

PARLE-Gची किंमत कधी वाढत का नाही? मग कंपनीला कसा होतो फायदा?

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

Parle-G: आपल्या कोणी लहानपणापासूनच आवडतं बिस्किट कोणतं विचारलं, तर पारलेजीचं नाव अनेकजण सांगतील. भारतातच नव्हे तर जगभरात पारलेजीचं कौतुक होत असतं. अनेक परिवार आपल्या दिवसाची सुरुवात पारलेजी खाऊन करतात. लहान मुलेदेखील दुधासोबत पारलेजी खाणे पसंद करतात. 

2/10

चव आजही तशीच

असा कोणी क्वचितच सापडेल ज्याने कधी चहासोबत पारलेजी खाल्ला नसेल. ही बिस्कीट खूप चवदार, स्वस्त आणि विशेष म्हणजे सगळीकडे उपलब्ध असणारे आहे. वेळेनुसार त्याच्या आकारामध्ये बदल नक्कीच झालाय पण चव आजही तशीच आहे. 

3/10

किंमत 5 रुपये

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

1994 मध्ये याचे 1 पॅकेट 4 रुपये होते. त्यावेळी पेट्रोल 16 रुपये तर डिझेल 8 रुपये होते. आज 29 वर्षानंतर पेट्रोल डिझेल शंभरीपार गेलंय पण पारलेजीची किंमत 5 रुपये झाली आहे. 

4/10

कंपनी तोट्यात?

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

महागाईच्या जमान्यात जिथे सर्व वस्तुंच्या किंमती गगनला भिडल्या असताना पारलेजीने किंमत जास्त न वाढवणे म्हणजे कंपनी तोट्यात असेल असे तुम्हालाही वाटत असेल तर थोड थांबा. 

5/10

हे कसे शक्य?

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

आजकाल दुधापासून साखरेपर्यंत सर्वाच्या किंमती वाढल्या असताना 25 वर्षात पारलेजी कंपनी आपल्या बिस्किट पुड्यांची किंमत वाढवत नाही, हे कसे शक्य होते? याबद्दल जाणून घेऊया. 

6/10

82 वर्षांपासून अस्तित्वात

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

पारलेजी कंपनी साधारण 82 वर्षांपासून अस्तित्वात आहे. गुणवत्ता, चव आणि पोषण अशी पारलेजीची ओळख बनली आहे. 1994 मध्ये पारलेजीची किंमत वाढवली होती. तेव्हापासून यात कोणताही बदल झाला नाही. 

7/10

दूध आणि ग्लुकोज

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

कोरोनामध्ये पारलेजी बिस्किटांची विक्री सर्वोच्च स्थानी होती. यामध्ये दूध आणि ग्लुकोज असल्याने लहान मुलांना आवर्जुन दिली जातात. कोरोना नंतर मात्र यामध्ये 1 रुपयाची वाढ करुन किंमत 5 रुपये करण्यात आली.

8/10

पुड्याचा आकार कमी

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

पैसे कमावण्यासाठी कंपनीने एक आयडीया शोधली. त्यांनी किंमत तीच ठेवली. किंमत वाढवण्याऐवजी कंपनीने बिस्किट पुड्याचा आकार कमी केला. 

9/10

55 ग्रॅम बिस्किट

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

याआधी एका पॅकेटमध्ये शंभर ग्रॅम बिस्किट यायची. काही वर्षानंतर ते 92.5 ग्रॅम इतके झाले. गेल्या काही वर्षात वाढती महागाई पाहता कंपनीने ते 55 ग्रॅमपर्यंत आणले आहे. आता 55 ग्रॅम बिस्किटसाठी 5 रुपये मोजावे लागतात.

10/10

100 कोटीहून अधिक पॅकेट

Why PARLE-G biscuits prices stable How company benefit interesting facts

पारलेजी प्रत्येक महिन्याला शंभर कोटीहून अधिक पॅकेट बनवतो. 13 लाख पॅकेट प्रति तास आणि 23 लाख पॅकेट प्रति मिनिट पॅकेट बनवतो, अशी माहिती समोर येते.