'स्वतःला भाग्यवान समजते की...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चला तर एकदा पाहुया...

| Sep 29, 2023, 11:03 AM IST
1/7

प्राजक्ता माळी

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहे. 

2/7

मुख्यमंत्र्यासोबत चर्चा

या फोटोत प्राजक्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना दिसली असून ते तिला नमस्कार करताना दिसले. 

3/7

मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

या फोटोत प्राजक्ता मुख्यमंत्र्यांचे दर्शन घेताना दिसत आहे. 

4/7

हास्यजत्रेची कास्ट

'हास्यजत्रे'तील संपूर्ण कलाकार मुख्यमंत्र्यांसोबत...

5/7

महेश लिमये

प्राजक्तानं यावेळी लोकप्रिय दिग्दर्शक महेश लिमये यांच्यासोबत दिसली. त्यांच्यासोबत तिनं सेल्फी शेअर केला आहे. 

6/7

प्राजक्ताला मिळाली ही भेट वस्तू

प्राजक्ताला मुख्यमंत्र्यांकडून शाल आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती भेट मिळाली आहे. 

7/7

हे फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणाली...

'सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी 'वर्षा बंगल्यावर' जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मा. मुख्यमंत्री व मा. श्री श्रीकांत दादा शिंदे यांचे; आम्हा कलाकारांना घरी बोलावल्याबद्दल, अत्यंत प्रेमाने पाहूणचार केल्याबद्दल मन:पुर्वक आभार! स्वतःला भाग्यवान समजते की दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटता येतय, आपल्या समस्या- अडचणी त्यांच्यासमोर मांडता येतायेत', असं कॅप्शन दिलं आहे. (All Photo Credit : Prajakta Mali Instagram)