अंतराळातील Dark Energy आणि अदृष्य वस्तुंचा शोध घेणार; यूरोपियन स्पेस एजेंसीची सर्वात मोठी मोहिम

लवकरच अंतराळातील अदृष्य शक्ती आणि अदृष्य वस्तुंचा उलगडा होणार आहे. यूरोपियन स्पेस एजेंसी मोठी मोहिम रावबणार आहे.

Sep 29, 2023, 00:07 AM IST

Euclid Mission Dark Energy : अंतराळ हे असंख्य रहस्यांनी बनलेली आहे. डोळ्यांना दिसणारे ग्रह, तारे तसेच टेलिस्कोपच्या मदतीने दिसणारे ऑब्जेक्ट यावर संशोधन केले जाते. मात्र, आता प्रथमच अंतराळातील Dark Energy अर्थात अदृष्य शक्ती आणि अदृष्य वस्तुंचा शोध घेतला जाणार आहे. यूरोपियन स्पेस एजेंसी सर्वात मोठी मोहिम राबवणार आहे. 

1/7

अंतराळ हे असंख्य रहस्यांचे जंजाळ आहे. अशातच अनेक अदृष्य शक्ती आणि अदृष्य वस्तुंचे अस्तित्व आपल्याला जाणवते. मात्र, त्या आपल्याला दिसत नाहीत याचे रहस्य उलगडणार आहे. 

2/7

युक्लिड दुर्बीण  गेल्या वर्षी रशियाच्या सोयुझ रॉकेटवर प्रक्षेपित होणार होते. मात्र, युक्रेनवरील हल्ल्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सीने रशियासोबतचे सर्व वैज्ञानिक करार रद्द केले. आता युरोपियन स्पेस एजन्सीने SpaceX च्या Falcon-9 रॉकेटच्या मदतीने हे दुर्बीण प्रक्षेपित करणार आहे.    

3/7

डार्क मॅटरच्या अदृष्य शक्तीमुळेच असंख्य आकाश गंगा यांचे अस्तित्व असल्याचा देखील दावा केला जात आहे.   

4/7

अंतराळाचा 80 टक्के भाग हा गदड अंधाराने झाकला गेला आहे. यालाच डार्क मॅटर असे म्हणतात.

5/7

1998 मध्ये सर्वप्रथम डार्क मॅटरचा उल्लेख करम्यात आला. या डार्क मॅटरमुळेच विश्वाची निर्मीती झाल्याचा दावा केला जात आहे.

6/7

डार्क मॅटरचा शोध घेण्यासाठी यूरोपियन स्पेस एजेंसी एक मोहिम रावबत आहे. युक्लिड मिशन असे याचे नाव आहे. या मोहिमेसाठी  89,148 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

7/7

अवकाशातील अनेक ऑब्जेक्ट हे त्यांच्या प्रकाशामुळे दिसतात. मात्र, अदृष्य वस्तु आणि अदृष्य शक्ती यांना डार्क मॅटर म्हणतात. अवकाशातील अनेक घडामोडी या डार्क मॅटरमुळे घडतात.