मॉल, दुकानात वस्तूंवर 199, 999 अशाच किंमती का असतात?

Shopping Mall Interestesting Facts: मॉल, दुकानात वस्तूंवर 199, 999 अशाच किंमती का असतात? तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करता तेव्हा त्यावर नेहमी 99, 199 अशीच किंमत छापलेली असते. पण यामागे नेमकं काय कारण आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 1 रुपया कमी केल्याने नेमका काय फरक पडतो?  

Jul 31, 2024, 18:40 PM IST
1/7

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करता तेव्हा त्यावर नेहमी 99, 199 अशीच किंमत छापलेली असते. पण यामागे नेमकं काय कारण आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 1 रुपया कमी केल्याने नेमका काय फरक पडतो?  

2/7

पण तुम्हाला हा फक्त 1 रुपयाचा फरक वाटत असला तरी यामागे मोठं मार्केटिंग आहे. यामागे मानसिक आणि आर्थिक अशी दोन्ही कारणं आहेत.   

3/7

याला फ्लॅसिबो इफेक्ट असंही म्हणतात. यामध्ये तुम्ही समोरच्याला एखादी गोष्ट अशाप्रकारे सांगता की, त्याला ती सहज सोपी वाटते.   

4/7

म्हणजे जर तुम्हाला एखाद्या वस्तूची किंमत 100 ऐवजी 99 सांगितली तर ती आपल्या मेंदूला स्वस्त वाटते आणि आपण ती खरेदी करताना फारसा विचार करत नाही.  

5/7

आपण खरेदी करताना जेव्हा किंमत पाहतो तेव्हा आकड्यांकडेही नजर जाते. जर तुम्हाला 100 ऐवजी फक्त दोन आकडे (99) दिसले तर तुम्हाला ती स्वस्त वाटते.   

6/7

तसंच आपण पहिला आकडा पाहतो. म्हणजे जर एखाद्या वस्तूच किंमत 900 असेल आणि तिथे 899 लिहिलं असेल तर आपल्याला 8 आकड्यामुळे ती स्वस्त वाटते. याउलट 9 आले तर अचानक ती महाग वाटू लागते.   

7/7

तसं तर सध्या ऑनलाइनचा जमाना असून, दुकानातही युपीआय पेमेंट केलं जातं. पण जर तुम्ही एखाद्या मॉल, दुकानात असाल आणि रोख पैसे देत असाल तर फक्त 1 रुपया असल्याने सोडून देता. अशाने हा पैसे दुकानदार किंवा मालकाच्या खिशात जातो.