'नवरा सलमान खान असेल तरच...' सर्वत्र लग्नाची चर्चा होत असताना सानिया मिर्झाचं विधान

लोकप्रिय भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकसोबत विभक्त झाल्यापासून सतत चर्चेत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसते. अशात आता एक नवी चर्चा झाली आहे आणि ती म्हणजे सानिया मिर्झाला या कारणामुळे सलमान खान हा तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत हवा आहे. 

| Jul 25, 2024, 15:49 PM IST
1/7

सानिया मिर्झा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. कधी तिचं नाव मोहम्मद शमीसोबत जोडण्यात येतं तर कधी काही दुसऱ्याच कारणामुळे...

2/7

खरंतर मोहम्मद शमीसोबत सानिया मिर्झाचा काही संबंध नाही, असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं. 

3/7

फक्त स्पोर्ट्सच्या क्षेत्रात नाही तर सानियाचे बॉलिवूडमध्ये देखील खूप चांगले संबंध आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे सलमान खान आणि सानिया मिर्झा हे जवळचे मित्र आहेत. 

4/7

9 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये सतत खेळाडूंवर एकामागे-एक अशा बायोपिक येत होत्या. तेव्हा सानिया मिर्झाला देखील तिच्या बायोपिकविषयी प्रश्न विचारण्यात आला. 

5/7

या मुलाखतीत सानियाला तिच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका कोणी साकारावी यावर प्रश्न विचारताच ही 'दीपिका पदुकोण'नं साकारावी असं उत्तर दिलं. 

6/7

नवऱ्याच्या भूमिकेसाठी सानिया मिर्झानं काहीही विचार न करता सलमान खानचं नाव घेतलं. 

7/7

याविषयी सविस्तर सांगत सानियानं सांगितलं की 'माझी इच्छा आहे की सलमाननं माझ्या बायोपिकमध्ये शोएबची भूमिका साकारावी. तो माझा चांगला मित्र आहे आणि माझा आवडता कलाकार देखील आहे.' दरम्यान, जेव्हा ही मुलाखत झाली होती तेव्हा सानिया आणि शोएब मलिक हे विवाहित होते.