Stree 2: 46 हजारांचा ब्लाऊज, तमन्ना भाटियाच्या साडीची किंमत पाहून बसेल धक्का!

 'स्त्री 2' चित्रपटातील नवीन गाणे 'आज की रात' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सध्या या गाण्यातील तमन्ना भाटियाच्या डान्सची तुफान चर्चा रंगली आहे. 

| Jul 25, 2024, 13:59 PM IST
1/6

लेटेस्ट फोटोशूट

तमन्ना भाटियाच्या डान्सचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

2/6

लाल रंगाची साडी

अभिनेत्री तमन्ना भाटियाने या फोटोमध्ये लाल रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

3/6

खास लुक

या फोटोमध्ये तमन्नाने मोकळे केस, कानातले आणि लिपस्टिकने हा लुक पूर्ण केला आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. 

4/6

श्रद्धा कपूरची कमेंट

ऐवढी सुंदर स्त्री कधीच पाहिली नाही, अशी कमेंट्स अभिनेत्री श्रद्धा कपूरने तमन्ना भाटियाच्या या लुकवर केली आहे. 

5/6

कॅप्शन चर्चेत

'खरीदी नहीं जा सकती, हसीनो की इजाजत…आज की रात' असं कॅप्शन तमन्ना भाटियाने फोटोंना दिलं आहे. 

6/6

एकूण किंमत

तमन्नाच्या या साडीची किंमत 79,500 तर कॉर्सेट ब्लाउजची किंमत 46,500 रुपये आहे. एकूण किंमत ही सुमारे 1.26 लाख रुपये इतकी आहे.