Kane Williamson: केन विलियम्सनला रनआऊट का दिलं नाही? पाहा नियम काय सांगतो?

Kane Williamson Run Out: वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. मात्र या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या रन आऊटवरून वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं.

| Nov 16, 2023, 10:21 AM IST
1/7

टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 रन्सने धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी न्यूझीलंडला 398 रन्सचं आव्हान दिलं होतं. 

2/7

न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान एक घटना घडली. टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या शोधात होती. केन विलियम्सन याला रनआऊट देण्यात आलं नाही. 

3/7

न्यूझीलंडच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये केन विलियम्सन रनआऊट होताना वाचला. केन क्रीजजवळ पोहचण्याआधीच स्टंप्सवरील बेल्सच्या लाईट्स पेटल्या. मात्र तरीही केनला नॉटआऊट देण्यात आलं.

4/7

बेल्सच्या लाईट्स लागूनही नॉटआऊट दिल्याने भारतीय चाहते चांगलेच संतापले होते.

5/7

यानंतर केनच्या रनआऊटचा रिप्ले पाहण्यात आला. या रिप्लेमध्ये केनच्या बॅटआधीच स्टंप लाईट पेटल्याचं स्पष्ट झालं.  

6/7

मात्र स्लोमोशनमध्ये पाहिल्यानंतर विकेटकीपर केएल राहुल याचा ग्लोव्ह्ज स्टंपला लागला होता. त्यामुळे लाईट्स पेटल्याचं समोर आलं. 

7/7

याचाच अर्थ नियमांनुसार बॉलआधी केन क्रीझमध्ये पोहचला. त्यामुळे केनला नॉट आऊट देण्यात आलं.