दिसेल त्या भारतीय गोलंदाजाला फोडणाऱ्या पूरनचा अनोखा विक्रम; जे कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं!

WI vs IND Nicholas Pooran Record: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यामध्ये टी-20 मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न ठरतोय तो म्हणजे निकोलस पूरन. इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळलेल्या या खेळाडूचा जबरदस्त फॉर्म हार्दिक पंड्या आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. मात्र याच फॉर्मच्या जोरावर त्याने एक अनोखी कामगिरी केली आहे. नेमकी काय आहे ही कामगिरी पाहूयात...

| Aug 07, 2023, 09:47 AM IST
1/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यानच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये यजमान संघाने भारतीय संघाला आणि चाहत्यांना धक्का दिला. वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने एकट्यानेच पाहुण्या संघातील गोलंदाजांची धुलाई केली. दिसेल त्या भारतीय गोलंदाजाला कुटणाऱ्या या फलंदाजाने नुकताच एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवलाय. त्याचबद्दल...

2/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

पूरन सध्याच्या घडीला टी-20 मधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असून तो सातत्यपूर्णपणे उत्तम कामगिरी करत आहे. त्याने मेजर क्रिकेट लीग 2023 मध्येच याची झळक दाखवली होती. त्याने 55 चेंडूंमध्ये नाबाद 137 धावा केल्या होत्या. 

3/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

सध्या पूरन भारतीय गोलंदाजीची पिसं काढताना दिसत आहे. भारताविरुद्ध अर्धशतक झळकावत पूरनने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅरॉन फिंचचा विक्रम मोडीत काढला आहे.

4/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

गुयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे सलामीवर अगदी स्वस्तात तंबूत परतले. 

5/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या मदतीला धावून आला तो तिलक वर्मा. त्याने 51 धावांची उत्तम खेळी करत भारतीय संघाला 152 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. 

6/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

153 धावांचा पाठलाग करताना यजमान संघाची अवस्था 10 धावांच्या आत 2 गडी बाद इतकी बिकट होती. त्याचवेळी निकोलस पूरन फलंदाजीला आला. मैदानात उतरल्यानंतर त्याने भारतीय गोलंदाजीची फिसं काढण्यास सुरुवात केली.

7/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

पूरनसमोर भारताचे सर्वच डावपेच अपयशी ठरल्याचं दिसून आलं. पूरनने केवळ 40 चेंडूंमध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 67 धावांची धडाकेबाज खेळी केली.

8/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

भारताविरुद्धच्या 67 धावांच्या खेळीच्या माध्यमातून पूरनने टी-20 मधील अॅरॉन फिंचचा विक्रम मोडीत काढला.  

9/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

भारताविरोधात निकोल पूरन अनेकदा प्रभावी कामगिरी करतो. त्याने भारताविरोधात अनेकदा मोठ्या धावसंख्या उभारताना खोऱ्याने धावा ओढल्यात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 

10/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

या फलंदाजीच्या जोरावर निकोलस पूरन आता भारताविरोधात टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅरॉन फिंचच्या नावावर होता. फिंचने टी-20 मध्ये भारताविरोधात 500 धावा केल्यात. 

11/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

दुसऱ्या टी-20 मध्ये अर्धशतकीय खेळी करुन पूरनने भारताविरोधात फिंचपेक्षा अधिक म्हणजेच 505 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरचा समावेश आहे. त्याने भारतीय संघाविरोधात 475 धावा केल्या आहेत. 

12/12

WI vs IND Nicholas Pooran hits blazing fifty becomes highest T20I run scorer vs India

पूररने आतापर्यंत भारताविरोधात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 5 अर्धशतकं झळकावली आहेत. यामध्येही त्याने जॉस बटलर आणि क्विंटन डिकॉकला मागे टाकलं आहे. या दोघांनीही भारताविरोधात प्रत्येकी 4 अर्धशकतं झळकावली आहेत.