2028 च्या Olympics मध्ये क्रिकेटचा होणार समावेश? ICC ने दिला नवा प्लॅन

गेल्या वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही असं व्हावं यासाठी आयसीसीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Jan 22, 2023, 12:42 PM IST
1/5

ICC ने अजूनही लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश करण्याबाबत आशावादी असल्याचं समजतंय. आयसीसीने खेळांच्या आयोजन समितीकडे पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांसाठी 6 टीम्सच्या T20 स्पर्धेची शिफारस केलीये.

2/5

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ऑक्टोबरमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत निर्णय घेणार आहे. त्यानंतर मार्चपर्यंत नवीन खेळांच्या यादीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

3/5

या वर्षी ऑक्टोबरच्या जवळपास होणाऱ्या मुंबईत आयओसीच्या अधिवेशनामध्ये याला मान्यता दिली जाणार आहे.

4/5

एका माहितीनुसार, BCCI सचिव जय शाह यांचा ICC अध्यक्ष ग्रेग बार्कले यांच्या अध्यक्षतेखालील ICC च्या ऑलिम्पिकच्या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंदिरा नुयी (स्वतंत्र संचालक) आणि पराग मराठे (माजी यूएस क्रिकेट असोसिएशन) यांचा समावेश आहे.   

5/5

क्रिकेटसोबतच इतर आठ खेळ - बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किक बॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्ट