World Cup 2023: किंग कोहली मोडणार सचिनचा विक्रम? करोडो फॅन्सच्या नजरा विराटवर

विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. आगामी एकदिवसीय विश्वचषकात तो बॅटने आपली ताकद दाखवेलच. सोबतच 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची त्याच्याकडे मोठी संधी आहे.

Oct 02, 2023, 09:25 AM IST

विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. आगामी एकदिवसीय विश्वचषकात तो बॅटने आपली ताकद दाखवेलच. सोबतच 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची त्याच्याकडे मोठी संधी आहे.

 

1/7

भारताच्या यजमानपदात  ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या आयसीसी स्पर्धेत भारतासह आणखी 10 संघ सहभागी होत आहेत.  

2/7

टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. भारताला तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे.  2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळाला होता.  

3/7

लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या बाबतीत भारतीय संघ सर्वोत्तम आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली हा संघातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो.  

4/7

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत विराटच्या नावे 47 शतकं आहेत आणि या विश्वचषकात सचिनचा 49 शतकांचा विश्वविक्रम मोडीत काढण्याचा विराट नक्कीच प्रयत्न करेल.   

5/7

सचिन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत विराटने विश्वचषकात 3 शतके ठोकल्यास तो इतिहास रचेल.  

6/7

होम ग्राउंड वर सामने होणार असल्याने भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.   

7/7

7 तर मग 12 वर्षांनी टीम इंडिया वर्ल्ड कप भारतात आणणार का हे पाहणे औचित्याचे ठरेल.