Womens Day : चाळीशी ओलांडलेल्या महिलांना उतारवयातील सौंदर्यासाठी मदत करेल प्लांट प्रोटीन, कसं ते समजून घ्या

International Womens Day : जागतिक महिला दिनानिमित्त चाळीशीनंतरच्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे. प्लांट प्रोटीन म्हणजे काय? 

| Mar 06, 2024, 12:27 PM IST

Plant Protein For Women : महिलांना खास करून चाळीशीनंतर अनेक आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. हार्मोन्समध्ये होणारे बदल, मेनोपॉझ, सांधेदुखी, कॅल्शियमची कमतरता, त्वचेच्या समस्या, थकवा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच उतरत्या वयात या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी हेल्दी एजिंग अतिशय महत्त्वाचं आहे. हेल्दी एजिंग म्हणजे काय? ते समजून घेऊया. 

1/9

प्लांट प्रोटीनचे सोर्स

How Plant Protein Beneficial For Womens

हेल्दी सप्लीमेंट्स तयार करण्यासाठी, नैसर्गिकरीत्या येणारे कर्बोदके, चरबी, खनिजे आणि फायबर काढून प्रथिने काढली जातात. प्लांट बेस पावडर मांस, मासे, अंडी आणि गाईच्या दुधापासून काढली जातात. तर प्लांट प्रोटीन हे धान्ये, सोयाबीन आणि बियाण्यांपासून मिळतात. डाळी ज्यामध्ये मूग, मसूर, तूर डाळ यांचा समावेश असतो.  चणे, ब्राऊन राईस आणि इतर  वेगवेगळ्या बिया, चिया सिड्स, फळभाज्यांच्या बिया,  हिरव्या पालेभाज्या,  सुकामेवा, काजू, बदाम, अक्रोड सोयाबीन आणि इतर उत्पादने, टोफू  क्विनोआ, ओट्स, पीनट बटर इत्यादी 

2/9

महिलांसाठी प्लांट प्रोटीनचे फायदे

How Plant Protein Beneficial For Womens

महिला आपल्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत आल्याचा अनुभव आहे. घर-ऑफिसयामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. अशावेळी अगदी स्वयंपाकघरात असलेल्या प्लांट प्रोटीनचा समावेश करावा. फक्त वरील पदार्थांचा डाएटमध्ये न चुकता समावेश करून घ्यावा. 

3/9

निरोगी आयुष्य

How Plant Protein Beneficial For Womens

प्लांट प्रोटीनमधून एकूण महिलांचे 3% ने निरोगी आरोग्य वाढल्याचे रिसर्चमध्ये दिसून आलं आहे. यामुळे महिलांना अगदी चाळीशीनंतरही अतिशय उत्साही आणि ताकदवान वाटते. 

4/9

स्ट्रोकपासून बचाव

How Plant Protein Beneficial For Womens

प्लांट प्रोटीनमध्ये लो-डेसिंटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कमी असते. यामुळे हृदय निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. चसेच हृदयाचे कार्य देखील चांगले चालते. यामध्ये फॅट कमी असून अँटीऑक्सिडेंटची मात्रा अधिक असते. 

5/9

वजन कमी करते

How Plant Protein Beneficial For Womens

चाळीशीनंतर महिलांना वजन कमी करणे फार कठीण होते. पोटाची चरबी दिवसेंदिवस वाढत जाते. तसेच या वयात हवे ते कपडे घालता येत नाही त्यामुळे अनेक महिला डिप्रेशनच्या शिकार होतात. फायबर आणि इतर पोषकतत्त्वांकरता भरपूर प्लांट प्रोटीन खाणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही जंक फूडपासून दूर राहता. 

6/9

मेनोपॉझच्या लक्षणांपासून आराम

How Plant Protein Beneficial For Womens

सामान्यपणे 45 च्या वयानंतर महिला रजोनिवृत्तीच्या काळात असतात. अशावेळी हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि त्याच्याशी निगडीत समस्या यांचा त्रास होत असतो. या सगळ्यामुळे थकवा -अशक्तपणामुळे मूड स्विंग्स होणे, सांधेदुखी यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्लांट प्रोटीनमुळे महिलांना या सगळ्या समस्यांना सामोरे जायला मदत मिळते. 

7/9

पचनक्रिया सुधारते

How Plant Protein Beneficial For Womens

या वयात महिलांची पचनक्रिया थोडी मंदावते. कारण अनेक महिलांची या काळात हालचाल कमी होते. यामुळे पचनक्रिया आणि त्याच्याशी संबंधीत त्रास सुरु होतात. अशावेळी प्लांट प्रोटीन पचवणे सोपे जाते. ब्राऊन राईस असो किंवा ओट्स, डाळ यामुळे पोट भरलेलंही राहतं आणि पचनक्रिया सुधारते. 

8/9

क्रोनिक आजारांचा धोका कमी

How Plant Protein Beneficial For Womens

प्लांट प्रोटीन हाडांपासून ते अगदी स्नायूपर्यंत सगळ्या शरीरातील आतील गोष्टी मजबूत करतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील मदत करतात. एवढंच नव्हे तर त्वचा, केस आणि नखांचे आरोग्य देखील सुधारतात. क्रोनिक आजारांचा धोका कमी करण्यास प्लांट प्रोटीन मदत करतात. जसे की, हार्ट अटॅक, डायबिटिस आणि कॅन्सरसारखे त्रास. संपूर्ण शरीर सकारात्मक राहण्यास मदत होते. 

9/9

सूज कमी होते

How Plant Protein Beneficial For Womens

प्लान्ट प्रोटीनमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीइंम्फ्लैमटरी कपाऊ्डस असतात. ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते. याचा फायदा सांध्यांमधील सूज कमी करण्यास होते. हृदय, पोट या अवयवांना आतून सूज असते. ती कमी होते.