पाकिस्तानी संघात 6.9 फूट उंचीच्या भारतीय खेळाडूची चर्चा; सरावादरम्यानचे Photos पाहाच

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars: वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेला पाकिस्तानचा संघ सध्या हैदराबादमध्ये असून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ कसून सराव करत आहे. मात्र पाकिस्तानी संघाच्या या सरावादरम्यान चर्चा आहे एका भारतीय तरुणाची. या तरुणाची उंची 6 फूट 9 इंच इतकी असून त्याने पाकिस्तानी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांवरही छाप सोडली आहे. जाणून घ्या कोण आहे हा तरुण अन् त्याची चर्चा का आहे?

| Sep 29, 2023, 13:30 PM IST
1/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

पाकिस्तानच्या सरावामध्ये 6 फूट 9 इंच उंचीच्या भारतीय गोलंदाजाची हवा; पण हा तरुण आहे तरी कोण? त्याची पाकिस्तानी संघात चर्चा का आहे जाणून घेऊयात सविस्तर....

2/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

पाकिस्तानचा संघ बुधवारी रात्री भारतात दाखल झाला असून आज ते न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचा संघ पहिला सराव सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी हैदराबादमध्ये कसून सराव करत आहेत.

3/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

पाकिस्तानी संघाच्या सरावादरम्यान 19 वर्षाखालील भारतीय संघातील हैदराबादमधील एका गोलंदाजाने सर्वांवरच आपली छाप सोडली आहे. 6 फूट 9 इंच उंची असलेल्या या तरुणांचं नाव आहे निशांत सरनू! 

4/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

निशांत सरनू हा नेटमधील गोलंदाज म्हणून पाकिस्तानी संघातील फलंदाजांना गोलंदाजी करत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यानंतर 12 तासांच्या आताच पाकिस्तानी खेळाडूंनी नेट्समध्ये सराव सुरु केला आणि त्यांना मागील 2 वर्षांपासून 19 वर्षांखालील क्रिकेट खेळणाऱ्या निशांत सरनूचा सामना करावा लागला.

5/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

पाकिस्तानच्या सरावादरम्यान हॅरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदीचा सराव करुन झाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाजीचा प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कलने निशांत सरनूला गोलंदाजी करण्यास सांगितलं. 

6/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

हॅरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी हे सामान्यपणे सरावामध्ये 140 ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करत असल्याने निशांतला अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची सूचना पाकिस्तानी गोलंदाज प्रशिक्षकांनी केली. 

7/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

निशांतने पाकिस्तानाचा सलामीवीर फकर जमानबरोबरच तळाच्या फलंदाजांच्या सरावादरम्यान गोलंदाजी केली. मात्र फरक जमानला निशांतने वेग वाढवल्यास त्याचे चेंडू भरकटतील असं वाटलं. मात्र तसं घडलं नाही.

8/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

"मी सध्या 125-130 किलोमीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करतो. मॉर्नी सरांनी मला वेग वाढवण्यास सांगितलं. त्यांनी इंडियन प्रमिअर लीगमध्ये मला लखनऊ सुपर जायंट्सच्या सरावादरम्यान गोलंदाजीसाठी तू उपलब्ध होऊ शकशील का अशी विचारणाही केली," असं निशांतने सांगितलं. निशांत मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना आपला आदर्श मानतो.

9/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

निशांतने यापूर्वी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हैदराबादमध्ये झालेल्या सामन्याच्या वेळेसही आंतरराष्ट्रीय फलंदाजांना गोलंदाजी केली होती. त्याने न्यूझीलंडचा गोलंदाज ग्लने फिलिप्सबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. 

10/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

पाकिस्तानी संघ आता हैदराबादमध्ये 2 आठवडे असणार असून अनेकदा सरावादरम्यान निशांतला गोलंदाजीची संधी मिळणार आहे. पाकिस्तानी फलंदाजांसमोर गोलंदाजी करुन निशांतला चांगला अनुभव तर मिळणार आहेच शिवाय शिकायलाही बरंच काही मिळेल अशी अपेक्षा आहे. 

11/11

6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars

"मला कसोटी आणि निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे. सध्या तरी हैदराबादसाठी प्राथमिक स्तराच्या क्रिकेट स्पर्धा खेळण्याचं माझं लक्ष्य आहे," असं निशांत म्हणाला.