Team India ला अमेरिकेतून WWE Superstar चा पाठिंबा! भारतीय जर्सीत पोस्ट केला फोटो

WWE Superstar Bleeds Blue Instagram Post Ahead Of World Cup 2023: भारतामध्ये खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा दीड महिने खेळवली जाणार असून जगभरात या स्पर्धेची चर्चा आहे. त्यातच ही चर्चा अमेरिकेतही पोहचल्याचे संकेत मिळत आहे ते एका डब्ल्यूडब्ल्यूईच्या सुपरस्टारच्या पोस्टमधून. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...

| Sep 29, 2023, 11:38 AM IST
1/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेची जगभरामध्ये चर्चा आहे. भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेची अमेरिकेतही चर्चा असल्याचे संकेत मिळत आहेत.

2/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

एकीकडे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच आता भारतीय संघाच्या समर्थनार्थ एक डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारही उतरला आहे.

3/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

वर्ल्ड वाइड रसलिंग म्हणजेच WWE च्या भारतीय सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय संघाला उघडपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

4/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

या अकाऊंटवरुन चक्क एका प्रसिद्ध WWE सुपर स्टारचा भारतीय संघाच्या जर्सीमधील फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

5/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

या फोटोमध्ये दिसणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारचं नाव ड्र्यू मॅकइन्टायर (Drew McIntyre) असं आहे.

6/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

फोटोच्या कॅप्शनमध्ये, "ड्र्यू ब्लीड्स ब्ल्यू" असं म्हणत भारतीय तिरंग्याच्या इमोजीही वापरण्यात आला आहे.  

7/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

डब्ल्यूडब्ल्यूईच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेला हा फोटो एडीटेड आहे. 

8/8

WWE Superstar Bleeds Blue Post Ahead Of World Cup 2023

काही काळापूर्वी भारतात झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूईच्या कार्यक्रमामध्ये ड्र्यू मॅकइन्टायर भारतीय चाहत्यांनी अगदी जल्लोषात स्वागत केलं होतं. त्यामुळेच डब्ल्यूडब्ल्यूईच्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.