world health day : दररोज 'या' ५ गोष्टी करा, शरीरासोबत मनही राहिल फ्रेश

Apr 07, 2021, 12:46 PM IST
1/6

तंदुरूस्त राहायचं असेल तर या 5 गोष्टी करा फॉलो

तंदुरूस्त राहायचं असेल तर या 5 गोष्टी करा फॉलो

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त या 5 नियमांचं पालन करा. ज्या तुम्हाला सुदृढ राहण्यास मदत करतील. नवा संकल्प करून आजपासूनच नव्या उमेदीने दिवसाला सुरूवात करा आणि आपली लाइफस्टाइल ऍक्टिव ठेवा. 

2/6

आता आपण काय करतोय? याकडे लक्ष द्या

आता आपण काय करतोय? याकडे लक्ष द्या

अनेकदा कामाच्या गडबडीत आपण नेमकं काय करतो. याकडे कुणाचंच लक्ष नसतं. म्हणजे अगदी आपण काय खातो? तिथपासू ते आपण काय विचार करतो इथपर्यंत. आताची लाइफस्टाइल इतकी धकाधकीची झाली आहे की, आपण किती तणावात काम करत असतो याची आपल्याला जाणीवही नसते. त्यामुळे दररोज एका विशिष्ट वेळेनंतर आता आपण नेमकं काय करतोय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे.   

3/6

दररोज 7-8 तास शांत झोप

दररोज 7-8 तास शांत झोप

आजारपणाचा संबंध हा तुम्चाया झोपेशी देखील आहेत. अमेरिकेतील हेल्थ वेबसाइट हेल्थलाइन डॉट कॉमने याबाबत माहिती दिली आहे. जर दररोज 7 ते 8 तास शांत झोप न झाल्यास अनेक व्याधी जडतात. आपल्या झोपेचा आपल्या उत्तम आरोग्याशी थेट संबंध असल्याचं समोर आलं आहे. 

4/6

एक्सरसाइजसोबतच फिजिकल एक्टिविटी करणे आवश्यक

एक्सरसाइजसोबतच फिजिकल एक्टिविटी करणे आवश्यक

व्यायाम केल्यामुळे फक्त तुझं शरीरचं हेल्दी राहतं असं नाही तर यामुळे तुमचा मेंदू आणि हार्मोन्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात. व्यायाम केल्यामुळे ब्लड शुगर, इंसुलिन आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवलमध्ये सुधार होतो. डिप्रेशनचा धोका कमी असतो. आठवड्यात 10 मिनिटे व्यायाम करणं फायदेशीर असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. 

5/6

ताण-तणावापासून दूर राहा

ताण-तणावापासून दूर राहा

हेल्दी लाइफस्टाइल म्हणजे फक्त चांगल जेवण आणि दररोजचा व्यायम असं नाही. तर यासोबतच ताण-तणाव मुक्त राहणं देखील गरजेचं आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे स्ट्रेसचे प्रमाण वाढलं आहे. डिप्रेशनमध्ये जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे मेडिटेशन करून स्ट्रेस फ्री राहणे अत्यंत गरजेचं आहे. 

6/6

वाईट सवयींपासून दूरच राहा

वाईट सवयींपासून दूरच राहा

अनेकजण दररोज न चुकता व्यायाम करतात. ताजं अन्न खातात. मात्र सोबतच दारू-सिगरेटचं सेवन करतात. अशावेळी तुमचं शरीर आणि मन निरोगी कसं राहणार? यामुळे वाईट सवयींपासून दूर राहा. या गोष्टी तुमच्या शरीराला हानीकारक असून घातक आहेत.