40 रेस्टोरंट, 7 स्विमिंग पूल! जगातलं सर्वात मोठं जहाज प्रवासासाठी निघालं... पाहा Inside Photo

Icon of the Seas : जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज आपल्या पहिल्या प्रवासासाठी निघालं आहे. आयकॉन ऑफ द सीज (Icon Of The Seas) असं या जहाजाचं नाव असून 1200 फूट लांबीचं आहे. 

| Jan 30, 2024, 20:58 PM IST
1/7

जगातील सर्वात मोठं क्रूझ जहाज आयकॉन ऑफ द सीज (Icon Of The Seas) आपल्या पहिल्या प्रवासासाठी निघालंय. मियामी बंदरातून या जहाजाने प्रवासाला सुरुवात केली आहे. सात दिवसात ते जहाज फ्लोरिडाला पोहोचेल

2/7

हे जहाज टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठं आहे आणि ते तयार करण्यासाठी 2 अब्ज डॉलर इतका खर्च आलाय. या 50 वर्षांपूर्वी या महाकाय जहाजाचं स्वप्न पाहण्यात आलं होतं. 

3/7

फिनलँडमध्ये हे जहाज तयार करण्यात आलं आहे.  'आयकॉन ऑफ द सीज' 1200 फूट लांब आहे. त्याचं अंदाजे वजन 2,50,800 टन इतकं असल्याचं सांगितलं जातं. 

4/7

या जहाजावर 20 डेक असून ते आठ हिस्स्यात विभागण्यात आलं आहे. यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या जहाजावर तब्बल 40 रेस्टोरंट्स आहेत. 

5/7

 'आयकॉन ऑफ द सीज'वर सहा वॉटरस्लाईड्स, 7 स्विमिंग पूल, एक आईस स्केटिग, एक थिएटर आहे. या जहाजाची प्रवासी क्षमता तब्बल 7600 इतकी असून 2350 कर्मचारी या जहाजावर आहेत. 

6/7

ऑक्टोबर 2022 मध्ये या क्रूझचं पहिल्यांचा अनावरण करण्यात आलं. बुकिंग सुरु झाल्यावर एका दिवसातच बुकिंगचा 53 वर्षांचा रेकॉर्ड नोंदवला गेला. यामध्ये 7 रात्रीच्या मुक्कामासह अनेक पॅकेजेस उपलब्ध आहेत.

7/7

प्रत्येक वर्ग आणि वयोगटातील लोकांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. यामध्ये जोडपी, अविवाहित लोक, आणि मोठ्या कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.