भारताचं टेन्शन वाढलं, शत्रू राष्ट्राच्या हाती लागलं सोन्याचं घबाड

World News : अरे बापरे!!! या भारताच्या या शेजारी देशात सापडली सोन्याची खाण? पाहणाऱ्यांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच ठेवता येईना   

Nov 29, 2024, 11:52 AM IST

World News : सोन्याची खाण... सहसा वाक्प्रचारांमध्या वापरले जाणारे हे शब्द प्रत्यक्षात पाहण्याची संधी फार कमीजणांना मिळते. पण, त्यातच एका देशात सध्या ही संधी मिळत आहे हेसुद्धा खरं. 

1/7

शेजारी राष्ट्र

World News gold mine discovered in china new gold discovery

World News : भारताच्या शेजारी राष्ट्रांपैकी एक असणाऱ्या आणि काही न काही कारणानं भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या देशामध्ये चक्क सोन्याची खाण सापडल्यामुळं साऱ्या जगाचं लक्ष या देशानं वेधलं आहे.   

2/7

गुणवत्ता

World News gold mine discovered in china new gold discovery

हा देश आहे चीन. उपलब्ध माहितीनुसार मध्य चीनमध्ये 1000 मेट्रिक टन इतक्या वजनाचा उच्च गुणवत्ता असणारा सोन्याचा साठा असल्याचा अंदाज वर्तवणअयात आला आहे. चीनमधील माध्यमांनीच यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

3/7

हुनान

World News gold mine discovered in china new gold discovery

हुनान प्रांतातील भूवैज्ञानिक ब्यूरोनं इथं उत्तर पूर्व क्षेत्रांमध्ये पिंगजियांगमध्ये हा सोन्याचा गडगंज साठा शोधला आहे. 

4/7

किंमत

World News gold mine discovered in china new gold discovery

चीनमधील शासकीय अख्तयारित येणाऱ्या माध्यमांच्या वृत्तानुसार या साठ्याची सरासरी किंमत साधारण 600 बिलियन युआन म्हणजेच 6,91,473 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.   

5/7

सोन्याचे साठे

World News gold mine discovered in china new gold discovery

चीमध्ये  सापडलेले हे सोन्याचे साठे पाहता दक्षिण आफ्रिकेतील साऊथ डीप माईनलाही चीन मागे टाकू शततो. दक्षिण आफ्रिकेमधील या प्रांतात 930 मेट्रिक टन इतका सोन्याचा साठा सापडला होता.   

6/7

सर्व्हेक्षण

World News gold mine discovered in china new gold discovery

दरम्यान, चीनमधील प्रारंभिक सर्वेक्षणानुसार 2 किमी अंतरापर्यंत खोलवर खोदकाम केलं असता 300 मेट्रिक टन सोन्याच्या 40 नसा पाहिल्या गेल्या आहेत. 

7/7

स्वर्णोद्योगाला चालना

World News gold mine discovered in china new gold discovery

अधिकृत माहितीनुसार व्यापक 3D परीक्षण आणि खोलवर आणखी अधिक प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचे संकेत इथं मिळतात. चीनमधील या बातमीमुळं येत्या काळात देशातील स्वर्णोद्योगाला आणखी नव्यानं चालना मिळण्याचे संकेत आहेत.