कमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा

World Tourism Day 2023: 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेकांना वर्ल्ड टूरवर जाण्याची इच्छा असते मात्र, बँक बॅलेन्स पाहून नेहमीच ही इच्छा मनात ठेवतो. पण जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशवारी करायची संधी मिळाली तर काय कराल. काही देशांमध्ये अगदी स्वस्तात आणि कमी खर्चात तुम्ही जाऊ शकता. 

| Sep 27, 2023, 13:11 PM IST
1/7

कमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

जागतिक पर्यटन दिवस 2023 जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ही मोहित संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संघटनेने सुरू केली होती. पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा चालना देण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा उद्देश लोकांना जगातील सुंदर पर्यटन स्थळे पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळावं हा आहे. 

2/7

मालदीव

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

मालदीव इंडियन सेलिब्रेटींसह सामान्य पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे. मालदीवमध्ये तुम्हाला राहण्यासाठी 1500 रुपयापर्यंत रुम मिळून जाईल. त्याचबरोबर, जेवण आणि पाणीदेखील इथे स्वस्त आहेत.60 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत चांगले खाण्याचे पर्याय आहेत. त्याबरोबर, एटॉल ट्रान्सफर, अलिमाथा आयलँड आणि हुकुरू मिस्की येथे फेमस टुरिस्ट स्पॉट आहेत. 

3/7

मलेशिया

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

ज्यांना स्वस्तात परदेशवारी करायची आहे त्यांच्यासाठी मलेशियालाही चांगला पर्याय आहे. तिथे तुम्ही 600-700 रुपयांमध्ये राहण्याची सोय आणि 300 रुपयांमध्ये जेवण ऑर्डर करू शकता. क्वालालंपूर, पेट्रोनल टॉवर, रेडांग बेट आणि कपास बेट ही येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

4/7

सीशेल्स

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

सीशेल्स भारतापासून खूप दूर असले तरी स्वस्त डेस्टिनेशन आहे. पूर्व आफ्रिकेत असलेल्या सीशेल्समध्ये 1000-1200 रुपयांमध्ये रुम बुक करु शकता. त्याव्यतिरिक्त, तुम्ही 500 रुपयांमध्ये जेवण ऑर्डर करू शकता. चुलत बेट, अरिड आयलंड, माहे बेट आणि मरीन नॅशनल पार्क हे या देशातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहेत

5/7

फिलीपिन्स

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

ज्यांना स्वस्तात परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी फिलीपिन्स हा एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही रु. 700-1000 मध्ये एक खोली भाड्याने घेऊ शकता, तर 500 रु.मध्ये तुम्ही उत्तम लंच किंवा डिनरचा आनंद घेऊ शकता. पलावान, एस. निडो, कॉर्डिलेरास, लोकोस आणि चॉकलेट हिल्स ही येथील उत्तम ठिकाणे आहेत. 

6/7

भूतान

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

भारताच्या जवळ असलेल्या भूतानमध्येही तुमची स्वस्तात ट्रिप होऊ शकते. भूतानमध्ये फुड खूप स्वस्त आहे. इथे तुम्हाला 500 रुपयांत चांगले जेवण मिळेल. 1500 रुपयांमध्ये तुम्ही येथे एक आलिशान खोली बुक करू शकता. भूतानमध्ये थिम्पू, पुनाखा झोंग, हा व्हॅली आणि रिनपुंग झोंग अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत.

7/7

नेपाळ

world tourism day 2023 cheapest foreign countries for indian tourist

भारतीय पर्यटकांसाठी नेपाळ ही उत्तम बजेट ट्रिप आहे. हे नैसर्गिक सौंदर्य, पर्वत, तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे. नेपाळचे चलन भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. याशिवाय नेपाळसाठी व्हिसाची गरज लागत नाही.