जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम, तब्बल 12 दिवस कारमध्येच अडकले होते लोक; रस्त्याशेजारी बांधली होती घरं
Longest Traffic Jam: चीनची (China) राजधानी बिजिंगमध्ये (Bijing) नागरिकांना जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. बिजिंग-तिबेट एक्स्प्रेस-वेवर अशी कोंडी झाली जी संपायचं नावच घेत नव्हती.
Longest Traffic Jam: चीनची (China) राजधानी बिजिंगमध्ये (Bijing) नागरिकांना जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. बिजिंग-तिबेट एक्स्प्रेस-वेवर अशी कोंडी झाली जी संपायचं नावच घेत नव्हती.
1/6
World's Longest Traffic Jam: मुंबई, दिल्ली, बंगळुरुमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणं ही आता सामान्य बाब आहे, कारमध्ये असतानाही मुंगीच्या वेगाने जावं लागतं तेव्हा हतबल होणं याशिवाय दुसरा काही पर्याय नसते. पण जर तुम्ही वाहतूक कोंडीत 12 दिवस अडकलात तर काय होईल याचा विचार करा. पण खरंच असंच झालं होतं. लोक तब्बल 12 दिवस वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी गाड्या जागेवरुन हलतही नव्हत्या.
2/6
चीनची राजधानी बिजिंगमधील नागरिकांना जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बीजिंग-तिबेट एक्सप्रेस-वेवर (China National Highway 110) असा ट्रॅफिक जॅम लागला जो संपायचं नावचं घेत नव्हता. जवळपास 100 किमी मोठा जॅम लागला होता. 12 दिवस गाड्या आणि गाडीतील लोक एकाच ठिकाणी अडकले होते. जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम आहे. जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त गाड्या होत्या.
3/6
मंगोलियाहून बीजिंगला कोळसा आणि बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी बीजिंग-तिबेट एक्स्प्रेसवेचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे वाहनं जाऊ शकली नाहीत. द्रुतगती मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली. मंगोलियाहून बीजिंगला बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने बीजिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग रोखला होता. अवघ्या काही वेळातच जाम इतका लांबला की प्रशासनाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी 12 दिवस लागले.
4/6
5/6
6/6