समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात; नेमक काय घडलं?

bus accident: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसचा चालक दानिश शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Jul 01, 2023, 23:09 PM IST

Samruddhi Expressway bus accident:  समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झालाय. ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 5 जणांवर उपचार सुरू आहेत.   नागपूरहून पुण्याकडे जाणा-या विदर्भ ट्रॅव्हल्सची बसला हा अपघात झाला.

1/7

या अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये वर्ध्यातून 14 प्रवासी बसलेले. त्यात 8 पुरुष,6 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश होता. 

2/7

वेगात असलेल्या बसच्या डिझेलची टाकी फुटून पेट घेतल्याचं अहवालात म्हटलं आहे. 

3/7

बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली...त्यामुळे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडर आदळली

4/7

या अहवालात टायर फुटून अपघात झाला नसल्याचं म्हटलं आहे. 

5/7

समृद्धीवरील अपघाताचा अमरावती RTO ने अहवाल सादर केला आहे. 

6/7

ही बस नागपूरवरुन संध्याकाळी पाच वाजता पुण्याकडे निघाली होती. रात्री अकरा वाजता ती कारंजात पोहोचली.. तेव्हा जेवणासाठी एका हॉटेलवर थांबली होती.. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला.

7/7

कारंजा इथं न्यू राधाकृष्ण हॉटेलवर जेवणासाठी ही बस थांबली होती. त्या हॉटेलाबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागल आहे.