तुम्हाला Smartphone घ्यायचाय? मग 'ही' ऑफर वाचा

Xiaomi 8 वर्षांपूर्वी भारतात आली होती आणि आज ही कंपनी भारतात आपला 8 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने ग्राहकांना मोठा फायदा देत या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जातोय.

Jul 09, 2022, 19:12 PM IST

मुंबई : हा  सेल Amazon आणि  Xiaomi कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 13 जुलैपर्यंत सुरु असणार आहे. या काळात, तुम्ही Xiaomi चे प्रीमियम फोन तसेच, बजेट डिव्हाइसेस स्वस्तात खरेदी करू शकतात.

1/5

Redmi Note 11 Pro

Redmi Note 11 Pro वर 4,000 रुपयांची डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे तो 18,999 रुपयांना मिळतोय आहे. यात 108MP + 8MP + 2MP + 2MP रिअर कॅमेरा, MediaTek Helio G96 प्रोसेसर, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.

2/5

Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi चा हा फ्लॅगशिप फोन 62,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. तुम्हाला इतर बँक ऑफरसह Xiaomi 12 Pro 5G च्या खरेदीवर 5,000 अतिरिक्त सूट दिली जात आहे. Xiaomi च्या वेबसाइटवर SBI क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला या डिव्हाइसवर 4,500 रुपयांची सूट मिळत आहे आणि Amazon वर तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने 6,000 रुपयांची सूट मिळत आहे.

3/5

Xiaomi 12 Pro

या फोनवर 18,000 रुपयांपर्यंत सूट आहे. फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची विक्री किंमत 84,999 रुपये आहे, जी 66,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. यात 50MP + 50MP + 50MP रियर कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे.

4/5

Xiaomi 11T Pro 5G

या Xiaomi स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे, परंतु ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डने Amazon खरेदीवर 4,500 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. यावर एक्सचेंज बोनस ऑफर देखील आहे.या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग आहे आणि स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

5/5

Redmi Note 11 Pro+

हा Redmi फोन 5000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 19,999 रुपयांना विकला जात आहे. यात 108MP + 8MP + 2MP रिअर कॅमेरा, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.