Delhi Floods : सर्वोच्च न्यायालय ते राजघाट; दिल्ली गेली पाण्याखाली...

Delhi Floods : दिल्लीच्या महत्त्वाच्या भागापासून ते अगदी लाल किल्ल्यापर्यंतचा परिसर जलमय झाल्याचं वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे. 

Jul 14, 2023, 12:39 PM IST

Delhin Floods : सर्वोच्च न्यायालय ते राजघाट; दिल्ली गेली पाण्याखाली... 

1/8

यमुना नदीची पाणी पातळी

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

Delhi Floods : गुरुवारी दिल्लीमध्ये यमुना नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली आणि पाहता पाहता संपूर्ण राजधानी जलमय झाली. शुक्रवारी तुलनेनं पाण्याची पातळी कमी असली तरीही अद्यापही राजधानीच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर साचलेलं पाणी कमी झालेलं नाही.

2/8

नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिल्लीत यमुना नदीची पाणीपातळी 208.66 मीटरपर्यंत पोहोचली. ज्यामुळं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. 

3/8

आता काय परिस्थिती?

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

शुक्रवारी मात्र या पाणीपातळीत काहीशी घट झाली असून, ती 208.38 मीटरपर्यंत आल्याची माहिती समोर आली.   

4/8

राजघाट

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

दिल्लीत झालेल्या पावसामुळं राजघाट परिसरही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं. तिथं ज्या लाल किल्ल्यावरून ध्वजारोहणाचे शासकी. कार्यक्रम पार पडतात त्या भागातही पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. 

5/8

वाहतुकीवर परिणाम

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात जलस्तर कमी झाला असला तरीही रिंग रोड भागात मात्र पाणी साचलेलंचं आहे त्यामुळं येथील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असणारा भैरो मार्ग अद्याप सुरु झालेला नाही.   

6/8

पुराचा धोका कायम

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

यमुनेची पाणी पातळी काही प्रमाणात कमी झाली असली तरीही पुराचा धोका मात्र अद्यापही कमी झालेला नाही ज्यामुळं सध्या यंत्रणाही सतर्क आहेत. राजधानीत आलेल्या या पुराचं पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या उंबऱ्यापर्यंतही पोहोचलं. 

7/8

यंत्रणेत अचानक बिघाड

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

आयटीओ परिसरामघ्ये पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्यामुळं या पुराचं पाणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. 

8/8

Delhi Floods

yamuna water level increases resulting water loging near supreme court rajghat and red fort photos

(सर्व छायाचित्रे- पीटीआय/ एएनआय)