Prajaktta Mali: 'होय, मी शिव्या दिल्या...', प्राजक्ता माळीने अखेर केला खुलासा!

शेवटची शिवी कधी दिलीस? प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता म्हणते...

Feb 01, 2023, 20:47 PM IST

Prajaktta Mali Photogallary: शेवटची शिवी कधी दिलीस? प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता म्हणते...

1/5

Prajaktta Mali Photo:  छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात खळखळून हसणारी प्राजक्ता सर्वांच्या नजरेत आजही असेल. याच प्राजक्ता माळीने (Prajaktta Mali) मोठा खुलासा केला आहे.(Yes smoked cigarettes cursed marathi actress prajakta mali last scolding on the sets of raanbaazaar photogallary)

2/5

प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिका देखील आहे. अभिनयाबरोबरच तिने व्यवसाय क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं आहेत. प्राजक्तराज (Prajaktaraj) नावाचा नवा ज्वेलरी ब्राँड (Jewelery brand) तिने सुरू केलाय.

3/5

एका मुलाखतीमध्ये शेवटची शिवी कधी दिलीस? असा प्रश्न प्राजक्ताला विचारला असता तिनं फार मजेशीर उत्तर दिलं. रानबाजारच्या (RaanBaazaar) सेटवर शेवटच्या शिव्या दिल्यात आणि भरपूर दिल्या, असं प्राजक्ता यावेळी म्हणाली आहे.

4/5

रानबाजार ही राजकारणावर आधारलेली (Political Web series) वेब सीरिज 2022 मध्ये रिलीज झाली. या सीरिजमधून प्राजक्तानं ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. तिची वेश्याची भूमिका त्यावेळी खूप गाजली होती.

5/5

दरम्यान, प्राजक्ताला (Prajaktta Mali) नुकताच पांडू सिनेमातील निगेटिव्ह भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा (Best Villains Actress) पुरस्कार देखील मिळाला आहे.