'ही' स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही; किंमत फक्त 55,000
Yulu Wynn Electric Scooter ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर आहे. किंमत आणि परफॉन्स दोन्ही बेस्ट आहेत.
Yulu Wynn Electric Scooter: भारतात इलेट्रीक वाहनांची डिमांड वाढली आहे. इलेक्ट्रीक कार प्रमाणाचे ग्राहक मोठ्या संख्यने इलेक्ट्रीक स्कूटर देखील खरेदी करत आहेत. टू व्हिलर अको की फोर व्हिलर... कोणतेही वाहन चालवायचे असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. मात्र, इंडियन मार्केटमध्ये एक अशी इलेक्ट्रीक स्कूटर लाँच झाली आहे जी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. Yulu Wynn Electric Scooter असे या स्कूटरचे नाव आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 68 किमी पर्यंत रेंज देते.