Yuvraj Singhच्या एक्स गर्लफ्रेन्ड्सची लिस्ट; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते प्रेमसंबंध

Yuvraj Singhचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं

May 23, 2021, 14:31 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंहच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असायची. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत देखील त्याचं नाव जोडलं गेलं. त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डच्या लिस्चमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचं देखील नाव आहे. पाहुया कोण होत्या युवीच्या एक्स...

 

1/6

अभिनेत्री किम शर्मा

अभिनेत्री किम शर्मा

'मोहब्बतें' (Mohabbatein) चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात अलेली अभिनेत्री किम शर्मा आणि  युवराज सिंह (Yuvraj Singh) 4 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. 2007साली दोघे विभक्त झाले. युवराजच्या आईला देखील त्यांचं नातं मान्य नव्हतं.   

2/6

अभिनेत्री दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण आणि युवराज सिंहच्या नात्याची चर्चांनी देखील जोर धरला होता. दीपिकाने युवराजची बर्थडे पार्टी देखील होस्ट केली होती.   

3/6

मिनिषा लाम्बा

मिनिषा लाम्बा

मिनिषा लाम्बा आणि युवराज सिंहचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये दोघे किस करताना दिसत होते. त्यानंतर मिनिषाने फोटोमध्ये मी नसून माझ्या सारखी दिसणारी महिला आहे. असं सांगितलं होतं.   

4/6

अभिनेत्री नेहा धुपिया

अभिनेत्री नेहा धुपिया

2014 साली नेहा आणि युवराज यांची भेट सोफी चौधरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं. पण नेहाने असं काही नसल्याचं सांगितलं. 

5/6

अभिनेत्री रिया सेन

अभिनेत्री रिया सेन

रिया आणि युवराज यांची भेट एका पार्टीमध्ये झाली. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. 

6/6

अभिनेत्री प्रिती झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटा

पंजाब कुडी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात रिलेशनशिप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर प्रितीने अस आमच्यात काहीही नाही. आम्ही डेटवर गेलेलो नसल्याचं देखील सांगितलं.