... म्हणून 'या' राशींच्या लोकांचं रिलेशनशिप फार काळ नाही टिकत

कधी काही लोकांचं रिलेशनशिप त्यांच्या स्वभावामुळे टिकत नाही, तर काही वेळेस त्यांच्यामागे ग्रहांची साडेसाती असते.

Jun 30, 2022, 15:34 PM IST

ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वागणुकीवर राशींचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत असतो असं सांगितल जातं. आज आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांमध्ये पार्टनरकडून फसवणूक केली जाण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रसंगी या व्यक्तींच्या रिलेशनशिपवर सावट येतं आणि विश्वासाची नातीही एका क्षणात तुटतात.

1/5

या राशीचे लोक नातेसंबंधातून Move On करतात

ज्या राशीच्या अधिपत्याखाली मूळ राशी असतात, त्यांचा प्रभाव त्यांच्या वागण्यातही दिसत असतो. उग्र राशीच्या प्रभावाखाली असलेले लोक उग्रता दाखवतात आणि शांत ग्रहाच्या राशीच्या लोकांमध्ये शांतता दिसून येते. बऱ्याच वेळा माणसांच्या वर्तनामुळेही नातेसंबंध टिकत नाहीत.

2/5

मेष

या राशीवर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे आणि यामुळेच अशा लोकांमध्ये आक्रमकता जास्त असते. रागामुळे त्यांचं नातं टिकत नाही आणि त्यांचा जोडीदार सहज भूतकाळ विसरुन पुढे जातो. अनेकदा या राशीचे लोक लव लाईफमध्ये यशस्वी होत नाहीत आणि त्यांचे एकापेक्षा जास्त अफेअर असण्याची शक्यता असते.

3/5

वृश्चिक

जेव्हा या राशीचे लोक प्रेम करतात तेव्हा ते मनापासून करतात, पण जेव्हा त्यांची फसवणूक होते किंवा प्रेमात कमतरता दिसून येते तेव्हा ते ते सहन करू शकत नाहीत. सूड घेण्याची भावना त्यांच्या मनात घर करते. यामुळेच, अनेकदा ते लोक जोडीदाराला धडा शिकवण्यासाठी एकापेक्षा जास्त अफेअर करतात.

4/5

तूळ

या राशीच्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल वाईट वाटतं आणि हेच कारण आहे की ज्यामुळे ते नातं टिकवू शकत नाहीत. म्हणून या राशीचे लोक झालं गेलं विसरुन आयुष्य पुढे नेतात. त्यांच्या भावनिक स्वभावामुळे, पार्टनरकडे जास्त दुर्लक्ष करणं त्यांना सहन होत नाही.

5/5

कुंभ

या राशीच्या लोकांना एकत्र बांधनात राहणं आवडत नाही. या नादात अनेकजण एकमेकांच्या प्रेमात पडतात. एवढंच नाही तर त्यांच ब्रेकअपही लवकर होत असतं. जेव्हा पार्टनर जोडीदाराला पूर्ण स्वातंत्र्य देतो तेव्हाच त्यांना त्यांच्या जोडीदाराची साथ मिळत असते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.)