मैदानातील हृदयद्रावक घटना, 6 क्रिकेटपटूनी खेळता-खेळता सोडले सोडला प्राण

मुंबई: खेळ म्हटलं की दुखापत किंवा दुर्घटनाही त्यापाठोपाठ आलीच पण अशा काही दुर्घटना आहेत ज्या कोणीही विसरू शकत नाही. मैदानात क्रिकेटपटूंनी खेळता खेळता जगाचा निरोप घेतला आणि उपस्थित खेळाडूंना अश्रू अनावर झाले.

May 12, 2021, 11:57 AM IST
1/6

6 मे 2021 - इंग्लंडमधील आताची ताजी घटना आहे. नेट प्रॅक्टीस दरम्यान क्रिकेटर जोशुआ डाउनी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. नेट प्रॅक्टीसदरम्यान डाउनी बेशुद्ध पडले. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

2/6

2014- या दुर्घटनेनं तर संपूर्ण क्रिकेटविश्व हळहळलं होतं. फिलिप ह्यूज यांचा सामन्या दरम्यान घटलेल्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाला. शॉन एबॉट बॉलरने टाकलेला बाउन्सर इतका भयंकर होता की तो थेट फिलिप ह्यूजच्या डोक्यावर जबरदस्त बसला. त्यामुळे जखमी झालेले ह्यूज खाली कोसळले. 3 दिवस ते कोमामध्ये होते. त्यानंतर 27 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. 

3/6

भारतीय टीमचे खेळाडू रमन लांबा यांच्यासोबत फील्डिंग करताना दुर्घटना घडली. फील्डिंग दरम्यान त्यांच्या डोक्याला बॉल लागला आणि ते खाली कोसळले. लांबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

4/6

इंग्लंडचे रिचर्ड ब्यूमोंट 2012 साली मैदानात खेळताना अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने गेले. त्यावेळी त्यांचं वय 33 वर्ष होतं. 

5/6

पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडू जुल्फिकार भट्टी यांना फलंदाजी दरम्यान छातीवर मार लागला आणि भट्टी खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत मृत घोषित करण्यात आलं. 

6/6

पुण्यात 17 फेब्रुवारी 2021 रोजी बाबू नलावडे नावाच्या एका खेळाडूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.