एक्सला विसरणे शक्य नाही? तर या 6 मार्गांना अवलंबून पाहा... तुम्हाला नक्की फायदा होईल

दु: ख, अपराधीपणा, लाज, राग  या नकारात्मक गोष्टी मनात घर करुन बसतात त्यामुळे आयुष्यात फक्त नकारात्मक गोष्टी शिल्लक राहिल्यासारखे माणसाला वाटते.

Updated: Jul 3, 2021, 03:20 PM IST
एक्सला विसरणे शक्य नाही? तर या 6 मार्गांना अवलंबून पाहा... तुम्हाला नक्की फायदा होईल title=

मुंबई : कोणत्याही कारणांमुळे जर दोन प्रेमींमध्ये ब्रेकअप झाले, तरी खऱ्या प्रेम करण्याऱ्या जोडप्याला किंवा व्यक्तीला आपल्या जोडीदाराला सहज विसरणे शक्य होत नाही. कारण जर एखादी व्यक्ती आपण आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर असेल, तर ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जाणे खूपच अवघड होते.

दु: ख, अपराधीपणा, लाज, राग  या नकारात्मक गोष्टी मनात घर करुन बसतात त्यामुळे आयुष्यात फक्त नकारात्मक गोष्टी शिल्लक राहिल्यासारखे माणसाला वाटते. जर तुमच्या बाबतीतही असे घडत असेल, तर यावर असे 6 मार्ग आहेत ज्याच्या अवलंब करुन तुम्ही कोणत्याही प्रकारचे दु: ख न बाळगता आयुष्यात पुढे जाऊ शकता.

1. लोक त्यांच्या भूतकाळातील गोष्टी त्यांच्या मनातच साठवून ठेवतात. यामुळे, लोकं जास्त भावनीक होतात आणि त्या नात्यात किंवा भावनेत अडकून राहतात. म्हणूनच या अशा गोष्टींना आपल्या मनातून काढून टाकणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही एकतर या गोष्टी अतिशय विश्वसनीय व्यक्तीसोबत शेअर करू शकता किंवा तुम्ही या प्रकरणात एखाद्या थेरपिस्टची मदत घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या डायरीत आपले विचार लिहून आपले मन शांत करू शकता. ज्यामुळे तुमचे मन मोकळे होईल.

2. जे काही झाले आहे आणि जे घडले त्याला स्वीकारणे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण स्वत: पुढे जाण्याचा निर्णय घ्याल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. असे विचार तुम्हाला आणि तुमच्या मानसिक स्थितीला आणखी बळकट बनवतात.

3.स्वत:ला वर्तमानात जगण्याची सवय लावा. स्वतःला वचन द्या आणि आश्वस्त करा की, तुम्ही भूतकाळाबद्दल विचार करणार नाही. यासाठी तुम्ही मेडिटेशनची मदत घ्या. एखाद्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली मेडिटेशन करा. जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल.

4. जेव्हा तुमच्या मनात नीगेटिव्ह किंवा भूतकाळातील विचार मनात येत असेल  तेव्हा दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि दुसऱ्या कामात मग्न व्हा. रिकामी मन हे सैतानाचे घर असते. म्हणून, आपण जे काही काम करत असाल ते मन लावून करा. त्याशिवाय तुम्ही लेखन, गाणे, नृत्य, चित्रकलेत तुमचे मन रमवू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

5. या प्रसंगी लोकं अशा स्वत: ची काळजी घेणे थांबवतात, स्वत:कडे दुर्लक्ष करतात, परंतु हे लक्षात ठेवा की, आपल्याकडे  चांगले आरोग्य असेल तरच आपण एक चांगले जीवन जगू शकू. म्हणून स्वत: ची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा.

6. ज्या लोकांची नात्यात फसवणूक झाली आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना लोकांना किंवा समोरील व्यक्तींना क्षमा करणे अवघड जाते. परंतु क्षमा केल्याने हृदयावरचे ओझे कमी होते. त्याच बरोबर क्षमा केल्याने तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम असाल. म्हणून लोकांना क्षमा करण्यास शिका.