अष्टविनायक दर्शन

Sep 20, 2012, 10:42 AM IST
1/9

चिंतामणी, थेऊरहवेली जिल्हा पुणे येथील थेऊरचा गणपती हे अष्टविनायकापैकी तिसरे स्थान. या स्थानाला कशामुळे महत्त्वाला आले यासंबंधीच्या तीन कथा आहेत. येथील श्रींचिंतामणींची मूर्ती डाव्या सोंडेची असून, पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. थेऊर गाव चिंतामणीस इनाम आहे. हे देवस्थान चिंचवड संस्थानच्या ताब्यात आहे.   चिंचवडचे मोरया गोसावी यांनी या थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्चरर्या केली होती. मोरया गोसावींना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. थेऊर क्षेत्राला फार महत्त्व आले ते थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या साध्वी पत्नी रमाबाई यांच्या सान्निध्यामुळे. मंदिराचा महादरवाजा उत्तर दिशेला असून मंदिर आहे. चिंचवडचे श्री. चिंतामणी देव यांनी हे गणपती मंदिर बांधले. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. बाजूच्या मुळामुठा नदीच्या डोहाला चिंतामणीतीर्थ असे म्हणतात.

चिंतामणी, थेऊर
हवेली जिल्हा पुणे येथील थेऊरचा गणपती हे अष्टविनायकापैकी तिसरे स्थान. या स्थानाला कशामुळे महत्त्वाला आले यासंबंधीच्या तीन कथा आहेत. येथील श्रींचिंतामणींची मूर्ती डाव्या सोंडेची असून, पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. थेऊर गाव चिंतामणीस इनाम आहे. हे देवस्थान चिंचवड संस्थानच्या ताब्यात आहे.

चिंचवडचे मोरया गोसावी यांनी या थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्चरर्या केली होती. मोरया गोसावींना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. थेऊर क्षेत्राला फार महत्त्व आले ते थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या साध्वी पत्नी रमाबाई यांच्या सान्निध्यामुळे. मंदिराचा महादरवाजा उत्तर दिशेला असून मंदिर आहे. चिंचवडचे श्री. चिंतामणी देव यांनी हे गणपती मंदिर बांधले. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. बाजूच्या मुळामुठा नदीच्या डोहाला चिंतामणीतीर्थ असे म्हणतात.

2/9

सिद्धिविनायक, सिद्धटेकसिद्धटेक तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमनगर. अष्टविनायकातील हे एक प्रसिद्ध स्थान आहे. विष्णूंच्या तपश्चटर्येने आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्याने पवित्र झालेली, अशी ही भूमी आहे. येथील विनायकाच्या मूर्तीची सोंड उजवीकडे झुकलेली असल्यामुळे हे दैवत कडक मानतात. देवळापासून जवळच महर्षी व्यासांचे स्थान आहे. विनायकाने इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर विनायकाचे देवालय उभे केले आणि त्यात श्री गजाननाची मूर्ती स्थापिली. विष्णूंना येथे सिद्धी मिळाली म्हणून या क्षेत्राला सिद्धक्षेत्र किंवा सिद्धटेक व विनायकाला सिद्धिविनायक असे नाव पडले. सिद्धटेक हे भीमेच्या काठी आहे. देवळानजीक हरिपंत फडक्यांकनी बांधलेला घाट आहे. वेशीपासून देवळापर्यंत फरसबंद मार्ग आहे. सिंहासन दगडी आहे. मधला गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. या मंदिराच्या जवळूनच भीमा नदी वाहते. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे.

सिद्धिविनायक, सिद्धटेक
सिद्धटेक तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमनगर. अष्टविनायकातील हे एक प्रसिद्ध स्थान आहे. विष्णूंच्या तपश्चटर्येने आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्याने पवित्र झालेली, अशी ही भूमी आहे. येथील विनायकाच्या मूर्तीची सोंड उजवीकडे झुकलेली असल्यामुळे हे दैवत कडक मानतात. देवळापासून जवळच महर्षी व्यासांचे स्थान आहे.

विनायकाने इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर विनायकाचे देवालय उभे केले आणि त्यात श्री गजाननाची मूर्ती स्थापिली. विष्णूंना येथे सिद्धी मिळाली म्हणून या क्षेत्राला सिद्धक्षेत्र किंवा सिद्धटेक व विनायकाला सिद्धिविनायक असे नाव पडले. सिद्धटेक हे भीमेच्या काठी आहे. देवळानजीक हरिपंत फडक्यांकनी बांधलेला घाट आहे. वेशीपासून देवळापर्यंत फरसबंद मार्ग आहे. सिंहासन दगडी आहे. मधला गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. या मंदिराच्या जवळूनच भीमा नदी वाहते. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे.

3/9

महागणपती, रांजणगावपुण्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे दुसरे अष्टविनायकांपैकी स्थान. त्याला गणपतीचे रांजणगाव असे म्हणतात. हे स्थान शिरूर म्हणजे घोडनदीच्या अलीकडे पुण्याजवळ आहे. शंकरांनी ज्या क्षेत्रात तपश्च्र्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळविला ते हे क्षेत्र. येथे त्यांनी मणिपूर नावाचे नगर वसविले तेच हे रांजणगाव.  देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या आतला मूर्तीचा गाभारा आणि बाहेरचा गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधली आहे. देवळात आज असलेल्या पूजामूर्तीच्या खाली तळघरात दुसरी एक लहान मूर्ती आहे तीच खरी श्रींची मूळमूर्ती. या मूर्तीला १० सोंड व २० हात आहेत असे म्हणतात. रांजणगाव देवस्थानास मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, यशवंतराव चंद्रचूड इत्यादींकडून इनामे मिळाली होती. पूर्वी भोर संस्थानकडूनही मदत मिळत असे. थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव इनाम करून दिलेला आहे.मंदिरात आज पूजेकरिता असणाऱ्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मूर्ती दिसायला सुंदर आहे. आसन मांडीचे आहे. मूर्तीचे कपाळ रूंद आहे. भाद्रपद चतुर्थीला उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होतो. हा गणपती नवसाला हटकून पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महागणपती, रांजणगाव
पुण्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे दुसरे अष्टविनायकांपैकी स्थान. त्याला गणपतीचे रांजणगाव असे म्हणतात. हे स्थान शिरूर म्हणजे घोडनदीच्या अलीकडे पुण्याजवळ आहे. शंकरांनी ज्या क्षेत्रात तपश्च्र्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळविला ते हे क्षेत्र. येथे त्यांनी मणिपूर नावाचे नगर वसविले तेच हे रांजणगाव.

देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या आतला मूर्तीचा गाभारा आणि बाहेरचा गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधली आहे. देवळात आज असलेल्या पूजामूर्तीच्या खाली तळघरात दुसरी एक लहान मूर्ती आहे तीच खरी श्रींची मूळमूर्ती. या मूर्तीला १० सोंड व २० हात आहेत असे म्हणतात. रांजणगाव देवस्थानास मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, यशवंतराव चंद्रचूड इत्यादींकडून इनामे मिळाली होती. पूर्वी भोर संस्थानकडूनही मदत मिळत असे. थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव इनाम करून दिलेला आहे.

मंदिरात आज पूजेकरिता असणाऱ्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मूर्ती दिसायला सुंदर आहे. आसन मांडीचे आहे. मूर्तीचे कपाळ रूंद आहे. भाद्रपद चतुर्थीला उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होतो. हा गणपती नवसाला हटकून पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

4/9

बल्लाळेश्वसर, पालीसुधागड हा रायगड जिल्ह्यातील तालुका. या तालुक्यात पालीमधील बल्लोळेश्वर हे अष्टविनायकापैकी पाचवे स्थान आहे. गणेशपुराणात या स्थानाचा उल्लेख व कथा आहे. बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन श्री गणेश हे त्या मुलाने पूजलेल्या शिळेत येऊन राहिले. त्यानंतर ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावली. भाद्रपद शु. चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना मी पूर्ण करीन, असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. हाच तो बल्लाळ विनायक. हे प्राचीन काळापासून जागृत स्थान मानले जाते.   बल्लाळेश्वराची स्वयंभू मूर्ती आहे. देवळाच्या मागच्या बाजूस श्रीधुंडीविनायकाचे देऊळ असून, त्यात श्रीधुंडीविनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. पूजाअर्चा करताना प्रथम श्रीधुंडीविनायकावर अभिषेक, आवर्तने व मग बल्लाळेश्वररावर, अशी प्रथा आहे.गाभाऱ्यात बल्लाळविनायकाची ३ फूट उंचीची मूर्ती आहे. सोंड डावीकडे झुकलेली आहे. तर दसऱ्याच्या दिवशी श्रींची पालखी निघते. विनायकी चतुर्थीला येथे श्रीगजानन मध्यरात्री प्रत्यक्ष भोजनास येतात, अशी श्रद्धा असल्याने या दिवशी दर्शनास गर्दी असते. दरमहा विनायकी व संकष्टी चतुर्थी या दिवशी पालखी निघते. यात्रेकरूंच्या सोईसाठी अतिथिगृहाची सोय आहे.

बल्लाळेश्वसर, पाली
सुधागड हा रायगड जिल्ह्यातील तालुका. या तालुक्यात पालीमधील बल्लोळेश्वर हे अष्टविनायकापैकी पाचवे स्थान आहे. गणेशपुराणात या स्थानाचा उल्लेख व कथा आहे. बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन श्री गणेश हे त्या मुलाने पूजलेल्या शिळेत येऊन राहिले. त्यानंतर ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावली. भाद्रपद शु. चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना मी पूर्ण करीन, असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. हाच तो बल्लाळ विनायक. हे प्राचीन काळापासून जागृत स्थान मानले जाते.

बल्लाळेश्वराची स्वयंभू मूर्ती आहे. देवळाच्या मागच्या बाजूस श्रीधुंडीविनायकाचे देऊळ असून, त्यात श्रीधुंडीविनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. पूजाअर्चा करताना प्रथम श्रीधुंडीविनायकावर अभिषेक, आवर्तने व मग बल्लाळेश्वररावर, अशी प्रथा आहे.गाभाऱ्यात बल्लाळविनायकाची ३ फूट उंचीची मूर्ती आहे. सोंड डावीकडे झुकलेली आहे. तर दसऱ्याच्या दिवशी श्रींची पालखी निघते. विनायकी चतुर्थीला येथे श्रीगजानन मध्यरात्री प्रत्यक्ष भोजनास येतात, अशी श्रद्धा असल्याने या दिवशी दर्शनास गर्दी असते. दरमहा विनायकी व संकष्टी चतुर्थी या दिवशी पालखी निघते. यात्रेकरूंच्या सोईसाठी अतिथिगृहाची सोय आहे.

5/9

विघ्नेश्वर, ओझरपुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर गावात विघ्येश्वराचे वास्तव्य आहे. गणपती पार्श्वु ऋषींना प्रसन्न झाला तो याच ठिकाणी, असे पुराणात वर्णिले आहे. त्याने पार्श्व‍ ऋषींचा पुत्र होऊन विघ्नासुराशी मोठे युद्ध केले व त्याला शेवटी शरण यावयाला लावले. विघ्नासुराने भक्तिपूर्वक गणपतीचे स्तवन करून देवाला विघ्नहर असे नाव घ्यावे, अशी विनंती केली आणि गणपतीने ती मान्य केली. देवांनी नैऋत्य दिशेला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याहकाळी गणपतीची या स्थानी स्थापना केली.    सर्व अष्टविनायकांच्या स्थानात हे स्थान अतिशय रमणीय म्हणून प्रसिद्ध आहे. अष्टविनायकात श्रीविघ्नेश्ववराला मान आहे. श्री विघ्नेहराचे देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. गाभाऱ्यात चारू बाजूंना छोटे कोनाडे असून, त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्रींच्या डावीकडे भिंतीवर कमलावर आरूढ अशी लक्ष्मी आणि उजवीकडे श्री विष्णूचे चित्र रेखाटलेले आहे. देवालय चारी बाजूंनी दगडी तटांनी बंदिस्त आहे. देवळाचा घुमट कलात्मक असून त्यावर शिखर व सोनेरी कळस आहे. देवळाचा दर्शनी भाग कोरीव असून, त्यावर दोन ऋषींच्या मूर्ती कोरल्या आहेत. श्रीविघ्नेश्वकराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. विघ्नहराची मूर्ती महिरपी डोलदार अशा कमानीत आहे. भाद्रपद व माघ चतुर्थी या दिवशी उत्सव साजरे होतात.

विघ्नेश्वर, ओझर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर गावात विघ्येश्वराचे वास्तव्य आहे. गणपती पार्श्वु ऋषींना प्रसन्न झाला तो याच ठिकाणी, असे पुराणात वर्णिले आहे. त्याने पार्श्व‍ ऋषींचा पुत्र होऊन विघ्नासुराशी मोठे युद्ध केले व त्याला शेवटी शरण यावयाला लावले. विघ्नासुराने भक्तिपूर्वक गणपतीचे स्तवन करून देवाला विघ्नहर असे नाव घ्यावे, अशी विनंती केली आणि गणपतीने ती मान्य केली. देवांनी नैऋत्य दिशेला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याहकाळी गणपतीची या स्थानी स्थापना केली.

सर्व अष्टविनायकांच्या स्थानात हे स्थान अतिशय रमणीय म्हणून प्रसिद्ध आहे. अष्टविनायकात श्रीविघ्नेश्ववराला मान आहे. श्री विघ्नेहराचे देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. गाभाऱ्यात चारू बाजूंना छोटे कोनाडे असून, त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्रींच्या डावीकडे भिंतीवर कमलावर आरूढ अशी लक्ष्मी आणि उजवीकडे श्री विष्णूचे चित्र रेखाटलेले आहे. देवालय चारी बाजूंनी दगडी तटांनी बंदिस्त आहे. देवळाचा घुमट कलात्मक असून त्यावर शिखर व सोनेरी कळस आहे. देवळाचा दर्शनी भाग कोरीव असून, त्यावर दोन ऋषींच्या मूर्ती कोरल्या आहेत.
श्रीविघ्नेश्वकराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. विघ्नहराची मूर्ती महिरपी डोलदार अशा कमानीत आहे. भाद्रपद व माघ चतुर्थी या दिवशी उत्सव साजरे होतात.

6/9

श्रीमयूरेश्‍वरपुणे जिल्ह्यातील मोरगावर येथे मयूरेश्वर गणेशाचे वास्तव्य आहे. पंचदेवतांनी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली. पूर्वीपासून या गावी मोरांची वस्ती असल्यामुळे त्याचे नाव मयूरग्राम-मोरगाव पडले असावे. हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. मोरगाव हे गाव कऱ्हा नदीच्या तीरावर वसले आहे.   येथे मुद्‌गलपुराणात वर्णिलेल्या गणेशाच्या आठ प्रतिमा आहेत. गाभाऱ्यातील मयूरेश्वअर गणेशाची मूर्ती नयनरम्य आहे. या मूख्य मूर्तीच्या पुढ्यात मूषक व मयूर आहेत. मयूर हे वाहन असल्यामुळे मयुरेश्वआर नाव. या मयूरेश्व्राच्या मूर्तीसंबंधी असे सांगतात, की खरी मूळ मूर्ती ही नाही. खरी मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न अशा अणूंची असून दृश्य‍ मूर्तीच्या मागे अदृश्यव आहे. ती प्रथम ब्रह्मदेवांनी स्थापन केली होती, पण सिंधु असुराने तिचा विध्वंस केल्यानंतर ब्रह्मदेवांनी दोन वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत या स्थानी आले तेव्हा मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी मूळ मूर्तीला तांब्याच्या भक्कम पत्र्याने बंदिस्त करून तिला लागूनच आजची दुसरी मूर्ती नित्यपूजेकरिता बसविली. अष्टविनायक यात्रेतील याचे स्थान अग्र आहे.

श्रीमयूरेश्‍वर
पुणे जिल्ह्यातील मोरगावर येथे मयूरेश्वर गणेशाचे वास्तव्य आहे. पंचदेवतांनी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली. पूर्वीपासून या गावी मोरांची वस्ती असल्यामुळे त्याचे नाव मयूरग्राम-मोरगाव पडले असावे. हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. मोरगाव हे गाव कऱ्हा नदीच्या तीरावर वसले आहे.

येथे मुद्‌गलपुराणात वर्णिलेल्या गणेशाच्या आठ प्रतिमा आहेत. गाभाऱ्यातील मयूरेश्वअर गणेशाची मूर्ती नयनरम्य आहे. या मूख्य मूर्तीच्या पुढ्यात मूषक व मयूर आहेत. मयूर हे वाहन असल्यामुळे मयुरेश्वआर नाव. या मयूरेश्व्राच्या मूर्तीसंबंधी असे सांगतात, की खरी मूळ मूर्ती ही नाही. खरी मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न अशा अणूंची असून दृश्य‍ मूर्तीच्या मागे अदृश्यव आहे. ती प्रथम ब्रह्मदेवांनी स्थापन केली होती, पण सिंधु असुराने तिचा विध्वंस केल्यानंतर ब्रह्मदेवांनी दोन वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत या स्थानी आले तेव्हा मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी मूळ मूर्तीला तांब्याच्या भक्कम पत्र्याने बंदिस्त करून तिला लागूनच आजची दुसरी मूर्ती नित्यपूजेकरिता बसविली. अष्टविनायक यात्रेतील याचे स्थान अग्र आहे.

7/9

वरद विनायकरायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाचे दुसरे स्थान. महडच्या वरद विनायकाची देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषींनी केली अशी अख्यायिका आहे. हजारो वर्षांपूर्वी हे ऋषी होऊन गेले. या ऋषींनी विनायकाची खडतर तप करून आराधना केली, तेव्हा श्रीविनायक त्यांच्यावर प्रसन्न झाले, असे सांगितले जाते. तपश्चधर्येच्या स्थानी देवाचे कायमचे वास्तव्य या दोन गोष्टी मागितल्या आणि श्रीविनायकाने त्या दोन्ही मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला. ते अरण्य म्हणजेच महड होय.  या मंदिराला पेशव्यांनी मदत केली आहे. गणपतीच्या पूर्वेस हरिहर गोसावी यांनी जिवंत समाधी घेतली होती. तपश्चेर्या करण्याकरिता हे स्थान सर्वस्वी अनुकूल आहे. सभोवतालचा परिसर अत्यंत रमणीय आहे. हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या चारी बाजूंना हत्तीच्या दोन दोन मूर्ती कोरलेल्या आहेत. घुमटावर सोनेरी रंगाचा कळस आहे. घुमटावर वरच्या बाजूस नागाची नक्षी आहे. पाठीमागे तळे आहे. आतील बाजूस सभामंडप आहे. दोन्ही बाजूस कोनाड्यात गणपतीच्या दोन मूर्ती आहेत. प्रवेश करताना वरच्या बाजूलाही गणेशाची मूर्ती दिसते. दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे. या सिंहासनावर दोन हत्ती व मध्ये देवी आहे. मूर्ती दगडी असून, तिची सोंड डावीकडे झुकलेली आहे. देवस्थानाला प्रथम छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सनद करून दिली.

वरद विनायक
रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाचे दुसरे स्थान. महडच्या वरद विनायकाची देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषींनी केली अशी अख्यायिका आहे. हजारो वर्षांपूर्वी हे ऋषी होऊन गेले. या ऋषींनी विनायकाची खडतर तप करून आराधना केली, तेव्हा श्रीविनायक त्यांच्यावर प्रसन्न झाले, असे सांगितले जाते. तपश्चधर्येच्या स्थानी देवाचे कायमचे वास्तव्य या दोन गोष्टी मागितल्या आणि श्रीविनायकाने त्या दोन्ही मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला. ते अरण्य म्हणजेच महड होय.

या मंदिराला पेशव्यांनी मदत केली आहे. गणपतीच्या पूर्वेस हरिहर गोसावी यांनी जिवंत समाधी घेतली होती. तपश्चेर्या करण्याकरिता हे स्थान सर्वस्वी अनुकूल आहे. सभोवतालचा परिसर अत्यंत रमणीय आहे. हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या चारी बाजूंना हत्तीच्या दोन दोन मूर्ती कोरलेल्या आहेत. घुमटावर सोनेरी रंगाचा कळस आहे. घुमटावर वरच्या बाजूस नागाची नक्षी आहे. पाठीमागे तळे आहे. आतील बाजूस सभामंडप आहे. दोन्ही बाजूस कोनाड्यात गणपतीच्या दोन मूर्ती आहेत. प्रवेश करताना वरच्या बाजूलाही गणेशाची मूर्ती दिसते. दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे. या सिंहासनावर दोन हत्ती व मध्ये देवी आहे. मूर्ती दगडी असून, तिची सोंड डावीकडे झुकलेली आहे. देवस्थानाला प्रथम छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सनद करून दिली.

8/9

गिरिजात्मज, लेण्याद्रीपुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील एका लेण्यात या गणपतीची स्थापना झालेली असल्यामुळे त्या गणपतीचे नाव लेण्याद्री गणपती असे पडले. हे अष्टविनायक स्थान आहे. येथील विनायकाला गिरिजात्मज असे नाव आहे. हिमालय गिरीची मुलगी पार्वती. तिने आपल्याला सुपुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्च्र्या केली. आपले मन एकाग्र व्हावे म्हणून तिने मातीची जी बालमूर्ती बनविली होती त्यातूनच, तिच्या भक्तीला वश होऊन श्री गजानन बाल होऊन प्रकट झाले अशी कथा आहे. आजूबाजूला काही बौद्ध लेणी आहेत. जुन्नरच्या उत्तरेस कुकडी नदीच्या पलीकडे एका डोंगरावर हे देवालय कोरून काढलेले आहे. देवळातील मूर्ती रेखीव नाही. एका कोरीव कोनाड्यात मध्यात गणेशप्रतिमा आहे. या देवाच्या डाव्या-उजव्या अंगांना लहान ओट्यावर मारुती, गणपती व शंकर हे मागाहून प्रस्थापित केलेले देव आहेत. येथील उत्सव भाद्रपद व माघ चतुर्थीस होतो. डोंगराच्या अगदी माथ्यावर महादेवाचे एक स्थान आहे. पूर्व बाजूला सीतेची न्हाणी आहे. येथून समोर पाहिले असता प्रसिद्ध शिवनेरी किल्ला दिसतो.

गिरिजात्मज, लेण्याद्री
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील एका लेण्यात या गणपतीची स्थापना झालेली असल्यामुळे त्या गणपतीचे नाव लेण्याद्री गणपती असे पडले. हे अष्टविनायक स्थान आहे. येथील विनायकाला गिरिजात्मज असे नाव आहे. हिमालय गिरीची मुलगी पार्वती. तिने आपल्याला सुपुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्च्र्या केली. आपले मन एकाग्र व्हावे म्हणून तिने मातीची जी बालमूर्ती बनविली होती त्यातूनच, तिच्या भक्तीला वश होऊन श्री गजानन बाल होऊन प्रकट झाले अशी कथा आहे.


आजूबाजूला काही बौद्ध लेणी आहेत. जुन्नरच्या उत्तरेस कुकडी नदीच्या पलीकडे एका डोंगरावर हे देवालय कोरून काढलेले आहे. देवळातील मूर्ती रेखीव नाही. एका कोरीव कोनाड्यात मध्यात गणेशप्रतिमा आहे. या देवाच्या डाव्या-उजव्या अंगांना लहान ओट्यावर मारुती, गणपती व शंकर हे मागाहून प्रस्थापित केलेले देव आहेत. येथील उत्सव भाद्रपद व माघ चतुर्थीस होतो. डोंगराच्या अगदी माथ्यावर महादेवाचे एक स्थान आहे. पूर्व बाजूला सीतेची न्हाणी आहे. येथून समोर पाहिले असता प्रसिद्ध शिवनेरी किल्ला दिसतो.

9/9

अष्टविनायक महिमाकोणत्याही कामांचा आरंभही गणपतीपूजनाने केला जातो. विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत आणि नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते. कोणत्याही लेखन कार्यास सुरवात करताना प्रारंभी श्रीगणेशायनम: असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती हा बुद्धिदाता असल्याने श्री गणेशायनम: असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो. महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. गणेश भक्तांसाठी महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन.

अष्टविनायक महिमा
कोणत्याही कामांचा आरंभही गणपतीपूजनाने केला जातो. विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत आणि नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते. कोणत्याही लेखन कार्यास सुरवात करताना प्रारंभी श्रीगणेशायनम: असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती हा बुद्धिदाता असल्याने श्री गणेशायनम: असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो. महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. गणेश भक्तांसाठी महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन.