1/7
2/7
महेला जयवर्धने (श्रीलंका)१०० वि. झिम्बाम्वे- मे २०१०
जयवर्धनेने २०१०च्या टी-२० सामन्यात सेंच्युरी केली होती. पावसामुळे १४ रन्सनी ते जिंकले होते. स्लो पीचवर रन्स काढणं इतरांसाठी कठीण वाटत होतं, तेव्हा जयवर्धनेने सेंच्युरी करून श्रीलंकेसाठी १७३ रन्सचा स्कोर बनवला.झिम्बाम्वे खेळताना मात्र पाऊस पडल्यामुळे झिम्बाम्वेने हारली होती.
3/7
सुरेश रैना (भारत) १०१ वि. दक्षिण आफ्रिका- मे २०१०
ट्वेंटी-२० विशेषज्ञ सुरेश रैनाने २०१०च्या २०-२० विश्वचषकात दुसरा विजय मिळवून दिला. हा विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये होता. रैनाने या सामन्यात ९ फोर्स आणि ५ सिक्सर्स मारून सेंच्युरी केली होती. ऑस्ट्रेलियाला भारतावर विजय मिळवणं सोपं वाटत होतं. मात्र १४ रन्सने ते हारले होते.
4/7
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)१०४* वि. ऑस्ट्रेलिया- ऑगस्ट २०११
पहिल्याच टी-२०मध्ये दिलशानने शानदा १०४ रन्स काढल्या होत्या. हा स्कोर करताना दिलशानने १२ फोर्स आणि ५ सिक्सर्स मारल्या होत्या. दिलशानच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाला फारसा प्रभाव पाडता येत नव्हता. श्रीलंकन स्पीनर्सपुढेही ऑस्ट्रेलियाची बॅटिंग फिकी पडली होती. नुकतंच पदार्पण केलेल्या दिलरुवान परेरानेही २६ बॉल्समध्ये ३ विकेट्स घेतल्या होत्या.
5/7
ब्रेंडन मॅक्कुलम (न्यूझीलंड) ११६* वि. ऑस्ट्रेलिया- फेब्रु २०१०
ब्रेंडन मॅक्कुलमने काढलेल्या ११६ धावांमुळेच न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं शक्य झालं होतं. या सामन्यात मॅक्कुलमने ५६ बॉल्समध्ये ११६ धावांची दमदार खेळी केली होती. त्यामुळे किवींना २० ओव्हर्समध्ये २१४/६ असा स्कोर करता येणं शक्य झालं होतं.
6/7
7/7