1/6
शोलेचा जय आणि विरू
‘शोले’ चित्रपटामधील ‘जय’ आणि ‘विरू’ म्हणजेच बीग-बी आमिताभ बच्चन अणि अभिनेता धर्मेंद्र यांच्या मैत्री अधोरेखित करणारा हा चित्रपट आपण कधीच विसरू शकणार नाही. जय हा अतिशय शांत तर विरू हा विनोदी... स्वभावभिन्नता असूनदेखील दोघांनी एकमेकांना पूर्णपणे समजून घेताना दिसतात. या दोघांमध्ये असलेली खरी आणि निखळ मैत्री गेली अनेक वर्ष अनेकांच्या मनात घर करून राहिलीय. खऱ्या मैत्रीचे हे एक चांगलं उदाहरण म्हणता येईल.
2/6
बॉलिवूडची मैत्री
मैत्री.... मैत्री म्हणजे काय? कशी होतो ही मैत्री? का होते ही मैत्री? कोणासोबत?... या प्रश्नांची उत्तर कधीच आपल्याला मिळत नाहीत. चांगले मित्र हे आपल्या सुख, दुःखात सात देणारे असतात. बऱ्याचदा स्वार्थासाठी तर कधी आधारासाठीही ही मैत्री केली जाते, हे खरंय... पण, त्यातूनही कधी कधी चांगले मित्र सापडतात.
आजच्या या मैत्री दिनानिमित्त पाहुयात चित्रपटांतून चित्रीत झालेली निखळ मैत्री...
3/6
`अंजली` आणि `राहूल`
एक टॉमबॉय अंजली म्हणजेच काजल आणि एक भपकेबाज कॉलेज बॉय राहुल म्हणजे किंग खान यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात मैत्रीचं अनोखं नातं चित्रीत करण्यात आलंय. दोघांची घट्ट मैत्री असूनही त्यांच्यात बऱ्याचदा भांडणही होतात. पण, शेवटी मात्र जीवनाचे सोबतीच होतात आणि एक निखळ मैत्री आयुष्यात चांगलं काही तरी देऊन जाते, हे पटतं
4/6
जिंदगी ना मिलेगी दोबारा
बालपणीचे तीन मित्र... तरुणवयात आयुष्यात सफल होण्यासाठी, बदलासाठी आणि धाडस आजमावून पाहण्यासाठी एका सहलीवर निघतात. इथं त्यांना अनेक संकटे येतात तेव्हा ते एकमेकांना पूर्ण आधार देतात आणि पुढे जाण्यासाठी ऐकमेकांना प्रोत्साहीत करतात. असे तीन मित्र म्हणजे अर्जून(हृतिक रोशन), इमरान( फरहान अख्तर) आणि कबीर (अभय देवोल)... ज्यांची ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात सखोल मैत्री आहे.
5/6