गाण्यांतून व्यक्त करा मैत्री...

Aug 04, 2013, 10:38 AM IST
1/10

यारों – रॉकफोर्ड‘यारों दोस्ती बडी ही हसीन है... ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है...’ गाण्याच्या शब्दच मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करत आहेत.. शंकर एहसान लॉय यांचं कम्पोझिशन असलेल्या या गाण्याला के.केनं आपल्या आवाजातून आणखीनच झळाळी देऊन श्रवणीय बनवलंय.

यारों – रॉकफोर्ड
‘यारों दोस्ती बडी ही हसीन है... ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है...’ गाण्याच्या शब्दच मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करत आहेत..

शंकर एहसान लॉय यांचं कम्पोझिशन असलेल्या या गाण्याला के.केनं आपल्या आवाजातून आणखीनच झळाळी देऊन श्रवणीय बनवलंय.


2/10

‘दिल चाहता है...’‘दिल चाहता है’ या सिनेमानं फरहान अख्तरला एक वेगळी ओळख मिळवून दिली. तीन मित्रांच्या ही कहाणी अतिशय सुंदर पद्धतीनं सिनेमात रेखाटण्यात आलीय.या सिनेमातील जवळजवळ सगळीच गाणी तरुणाईच्या तोंडपाठ झाली होती. त्यापैंकीच एक होतं या सिनेमाचं टायटल साँग... ‘दिल चाहता है, हम ना रहे कभी यारों के बिन…’एखादी सामान्य व्यक्तीही स्वत:ला या गाण्यांशी कनेक्ट करू शकेल अशीच ही गाणी होती. सिनेमात या तीन मित्रांची भूमिका पार पाडलीय आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी...

‘दिल चाहता है...’

‘दिल चाहता है’ या सिनेमानं फरहान अख्तरला एक वेगळी ओळख मिळवून दिली. तीन मित्रांच्या ही कहाणी अतिशय सुंदर पद्धतीनं सिनेमात रेखाटण्यात आलीय.

या सिनेमातील जवळजवळ सगळीच गाणी तरुणाईच्या तोंडपाठ झाली होती. त्यापैंकीच एक होतं या सिनेमाचं टायटल साँग... ‘दिल चाहता है, हम ना रहे कभी यारों के बिन…’

एखादी सामान्य व्यक्तीही स्वत:ला या गाण्यांशी कनेक्ट करू शकेल अशीच ही गाणी होती. सिनेमात या तीन मित्रांची भूमिका पार पाडलीय आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी...


3/10

जाने नही देंगे तुझे – थ्री इडियटस्आपल्या मित्राला आपल्यापासून दूर होताना बघताना एखाद्याच्या मनात काय भावना असू शकतात, याची प्रचितीच या गाण्यांतून येते. हे हृदयस्पर्शी गाण्याला सोनू निगमनं आपला आवाज देऊन आणखीनच धार दिलीय.थ्री इडियटस् या चित्रपटातील दोन मित्र आमीर खान आणि आर. माधवन आपल्या मित्राचा शर्मन जोशीचा जीव वाचवण्यासाठी करत असलेली धडपड चित्रीत करण्यात आलीय.

जाने नही देंगे तुझे – थ्री इडियटस्

आपल्या मित्राला आपल्यापासून दूर होताना बघताना एखाद्याच्या मनात काय भावना असू शकतात, याची प्रचितीच या गाण्यांतून येते. हे हृदयस्पर्शी गाण्याला सोनू निगमनं आपला आवाज देऊन आणखीनच धार दिलीय.

थ्री इडियटस् या चित्रपटातील दोन मित्र आमीर खान आणि आर. माधवन आपल्या मित्राचा शर्मन जोशीचा जीव वाचवण्यासाठी करत असलेली धडपड चित्रीत करण्यात आलीय.


4/10

सलामत रहे दोस्ताना हमारा – दोस्ताना (१९८१)मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची अनोखी जुलगबंदी सलामत रहे दोस्ताना हमारा या गाण्यातून पाहायला मिळते. सिनेमात हे गाणं चित्रीत करण्यात आलंय ते शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीवर... आनंद बक्षी यांनी या गाण्याचे बोल लिहिलेत..

सलामत रहे दोस्ताना हमारा – दोस्ताना (१९८१)

मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची अनोखी जुलगबंदी सलामत रहे दोस्ताना हमारा या गाण्यातून पाहायला मिळते. सिनेमात हे गाणं चित्रीत करण्यात आलंय ते शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीवर... आनंद बक्षी यांनी या गाण्याचे बोल लिहिलेत..


5/10

यारी है इमान... – जंझीरमन्ना डे यांनी गायलेलं ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी…’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हातात रुमाल घेऊन नाचणारे प्राण... अमिताभ बच्चन आणि प्राण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं मैत्रीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं...

यारी है इमान... – जंझीर

मन्ना डे यांनी गायलेलं ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी…’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हातात रुमाल घेऊन नाचणारे प्राण... अमिताभ बच्चन आणि प्राण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं मैत्रीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं...


6/10

दिये जलते हैं – नमक हराम‘नमक हराम’ या सिनेमातील ‘दिये जलते है’ हे गाणं आर. डी. बर्मन यांनी गायलेलं... सिनेमात राजेश खन्ना हे गाणं त्याच्या मित्रासाठी म्हणजेच अमिताभ बच्चनसाठी गाताना दिसतो.

दिये जलते हैं – नमक हराम

‘नमक हराम’ या सिनेमातील ‘दिये जलते है’ हे गाणं आर. डी. बर्मन यांनी गायलेलं...

सिनेमात राजेश खन्ना हे गाणं त्याच्या मित्रासाठी म्हणजेच अमिताभ बच्चनसाठी गाताना दिसतो.


7/10

तेरे जैसा यार कहा – यारानाकिशोर कुमार यांनी गायलेलं हे आणखी एक मेलॉडी साँग... याराना या सिनेमातील तेरे जैसा यार कहां रे... असं म्हणताना थिरकणारा अमिताभ आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर येतो. अमजद खान यांच्यासाठी बीग बी या सिनेमात हे गाणं म्हणत आहेत.

तेरे जैसा यार कहा – याराना

किशोर कुमार यांनी गायलेलं हे आणखी एक मेलॉडी साँग... याराना या सिनेमातील तेरे जैसा यार कहां रे... असं म्हणताना थिरकणारा अमिताभ आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर येतो. अमजद खान यांच्यासाठी बीग बी या सिनेमात हे गाणं म्हणत आहेत.


8/10

अरे यारों मेरे प्यारों - जो जिता वही सिकंदरआमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यामधील रोमांटिक गाण्यांमुळे जास्त गाजला असला तरी सिनेमा लक्षात राहतो तो त्यातील मैत्रिच्या पक्क्या धाग्यामुळे... ‘पहला नशा...’ या गाण्यापेक्षा तुम्हाला आज ‘अरे यारों मेरे प्यारों’ हे गाणं ऐकून त्यावर आपल्या मित्रांबरोबर ताल धरायला नक्कीच आवडेल. हे गाणं गायलंय उदीत नारायण आणि विजेता पंडित यांनी...

अरे यारों मेरे प्यारों - जो जिता वही सिकंदर

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यामधील रोमांटिक गाण्यांमुळे जास्त गाजला असला तरी सिनेमा लक्षात राहतो तो त्यातील मैत्रिच्या पक्क्या धाग्यामुळे... ‘पहला नशा...’ या गाण्यापेक्षा तुम्हाला आज ‘अरे यारों मेरे प्यारों’ हे गाणं ऐकून त्यावर आपल्या मित्रांबरोबर ताल धरायला नक्कीच आवडेल.

हे गाणं गायलंय उदीत नारायण आणि विजेता पंडित यांनी...



9/10

‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ -  ‘शोले’जेव्हा आपण मैत्रीबद्दल आणि मैत्रीच्या गाण्यांबद्दल बोलत असू आणि शोलेचा उल्लेख होणार नाही, हे शक्य आहे का...१९७० साली आलेल्या ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या या सिनेमातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे... तोडेंगे दम अगर तेरा साथ ना छोडेंगे’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी जिवलग मित्रांची भूमिका या सिनेमात पार पाडली होती. तर मन्ना डे आणि किशोर कुमार यांनी आपला आवाज या गाण्याला दिला होता.

‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ - ‘शोले’

जेव्हा आपण मैत्रीबद्दल आणि मैत्रीच्या गाण्यांबद्दल बोलत असू आणि शोलेचा उल्लेख होणार नाही, हे शक्य आहे का...

१९७० साली आलेल्या ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या या सिनेमातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे... तोडेंगे दम अगर तेरा साथ ना छोडेंगे’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी जिवलग मित्रांची भूमिका या सिनेमात पार पाडली होती. तर मन्ना डे आणि किशोर कुमार यांनी आपला आवाज या गाण्याला दिला होता.


10/10

बॉलिवूडनं पकडला मैत्रिचा धागा...मैत्रीदिनानिमित्त आज आपण पाहणार आहोत... बॉलिवूडमधील हाच क्षण सेलिब्रेट करणारी काही गाणी... सिनेमांत निव्वळ मैत्रिचा धागा पकडून गुंफलेल्या कथा तशा किंचितच पाहायला मिळतात पण ज्या सिनेमांत हा प्रयत्न केला गेलाय तो यशस्वी झालेला दिसलाय. ‘शोले’च्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ पासून ते ‘दिल चाहता है’पर्यंत अनेक गाण्यांतून आपली मैत्री संगीतकारांनी रचनाबद्ध केलीय. आजचा हा दिवस... मैत्रीचा दिवस आपल्या आवडत्या मित्राला – मैत्रिणीला ही गाणी डेडीकेट करून तुम्हीही साजरा करू शकता...चला पाहुयात... गाण्यांमध्ये काय काय मिळतायत ऑप्शन ते पाहुयात...

बॉलिवूडनं पकडला मैत्रिचा धागा...
मैत्रीदिनानिमित्त आज आपण पाहणार आहोत... बॉलिवूडमधील हाच क्षण सेलिब्रेट करणारी काही गाणी... सिनेमांत निव्वळ मैत्रिचा धागा पकडून गुंफलेल्या कथा तशा किंचितच पाहायला मिळतात पण ज्या सिनेमांत हा प्रयत्न केला गेलाय तो यशस्वी झालेला दिसलाय.

‘शोले’च्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ पासून ते ‘दिल चाहता है’पर्यंत अनेक गाण्यांतून आपली मैत्री संगीतकारांनी रचनाबद्ध केलीय. आजचा हा दिवस... मैत्रीचा दिवस आपल्या आवडत्या मित्राला – मैत्रिणीला ही गाणी डेडीकेट करून तुम्हीही साजरा करू शकता...

चला पाहुयात... गाण्यांमध्ये काय काय मिळतायत ऑप्शन ते पाहुयात...