1/6
रेकॉर्डवीर विराट कोहली, सचिनला टाकले मागे
टीम इंडियाचे भविष्य सध्या ‘विराट’ दिसत आहे. दिल्लीचा स्टार प्लेअर विराट कोहलीने ज्या प्रकारे कर्णधारपद सांभाळले, त्यावरून असे दिसते की २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये आपल्याला आणखी एक लीडर मिळाला आहे.
प्रथम वेस्ट इंडिज आणि आता झिम्बाब्वेच्या विरोधात सेंच्युरी लागावून त्याने असा काही कारनामा केला आहे की तो भारताच्या कोणत्याही दिग्गजाने केलेला नाही.
विराट समोर धावांचे लक्ष्य काही खास नव्हते, परंतु, कर्णधार असताना धैर्याने त्याचा सामान करत आपली लीडरशीप क्वॉलिटी दाखवली ती काही तरी खास होती. अवघड पिचवर सर्व टॉप ऑर्डर फलंदाजांचा स्ट्राइक रेट १०० पेक्षा कमी होता, तेव्हा कोहलीने १०६.४८च्या स्ट्राइक रेटने शानदार शतक झळकावले.
केवळ १०८ चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह 115 रन बनवले.
या सेंच्युरीने २४ वर्षीय कोहलीने असा एक विक्रम केला की त्याची बरोबरी येणाऱ्या दिवसात कोणी करू शकणार नाही.
2/6
सर्वात कमी डावात झळकावले १५ शतक
झिम्बाब्वे विरोधात ११५ धावा म्हणजे विराट कोहलीच्या करिअरमधले १५ वन डे शतक होते. या सेंच्युरीच्या जोरावर त्याने एक खास वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
सर्वात कमी सामन्यात १५ सेंच्युरी लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कोहलीने १५ षटकांसाठी १०६ डाव खेळला आहे. या १५ सेंच्युरींमध्ये १४ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर एकात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
सर्वात कमी डावात १५ सेंच्युरी झळकावणारे खेळाडू
विराट कोहली - 106 डाव
सईद अनवर - 143 डाव
सौरव गांगुली - 144 डाव
क्रिस गेल - 147 डाव
हर्शेल गिब्स - 161 डाव
डेस्मंड हेयन्स - 166 डाव
रिकी पोंटिंग - 180 डाव
सचिन तेंडुलकर - 182 डाव
विराट कोहली कोणाविरोधात किती सेंच्युरी लगावल्या
श्रीलंका - 5
वेस्ट इंडीज, इंग्लड, बांग्लादेश - 2
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, झिम्बाब्वे - 1
3/6
दोन सेंच्युरीने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
परदेशी मैदानावर कर्णधार पद सांभाळून २४ व्या वर्षी दोन सेंच्युरी झळकवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तर जगात तो तिसरा खेळाडू बनला आहे.
विराट कोहलीने कपिल देव यांच्या १९८३ मध्ये बनवलेल्या शतकाचा रेकॉर्ड झिम्बाब्वे विरुद्ध सेंच्युरी लगावून तोडला. १९८३ मध्ये कपिलने झिम्बाब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती.
रेकॉर्ड बनविणारे शूरवीर...
ग्रीम स्मिथ (साउथ आफ्रीका) - 2 सेंच्युरी
विराट कोहली (भारत) - 2 सेंच्युरी
पोर्टरफील्ड (आयर्लड) - 2 सेंच्युरी
कपिल देव (भारत) - 1 सेंच्युरी
स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) - 1 सेंच्युरी
मोहम्मद अशरफुल (बांग्लादेश) - 1 सेंच्युरी
शाकिब अल हसन (बांग्लादेश) - 1 सेंच्युरी
सचिन तेंडुलकर (इंडिया) - 1 सेंच्युरी
हे सर्व शतक जिंकलेल्या सामन्यात लगावलेले आहेत.
4/6
कोहलीची कॅप्टन्सीची कमाल
विराट कोहलीने रन्स बरोबर कॅप्टन्सीमध्येही झेंडा रोवला आहे. तिरंगी मालिकेत श्रीलंकेला केवळ ९६ धावांत गारद करून त्याने महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकले आहे.
भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी कमाल करत श्रीलंकेला ९६ धावांत गारद केले होते. २००५ मध्ये पहिल्यांना टीम इंडियाने परदेशी जमीनीवर विरोधी टीमला १०० धावांच्या आत गारद केले.
२९ ऑगस्ट २००५ ला हरारेमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेलाला ६५ धावांमध्ये गारद केले होतं.
कर्णधार धोनी परदेशी मैदानावर असा कारनामा एकदासुद्धा करू शकला नाही. पण कोहलीने केवळ दुसऱ्याच सामन्यात हा कारनामा करून दाखवला आहे.
5/6
सर्वात युवा मॅच विनर बनला कोहली
विराटचे वय सध्या २४ वर्षे आहे. केवळ पाच वर्षाच्या करिअरमध्ये त्याने असे काही यश मिळवले की, जे सचिन तेंडुलकरनेही मिळवले नव्हते.
विराट कोहली जिंकलेल्या सामन्यात सर्वाधिक सेंच्युरी लगावणारा फलंदाज बनला आहे. २४ व्या वर्षी त्याच्या पेक्षा अधिक सेंच्युरी लगावणारा कोणी फलंदाज नाही.
२४ वर्षापेक्षा कमी वयात विनिंग सेंच्युरी लगावणारे फलंदाज
विराट कोहली - 14
सचिन तेंडुलकर - 10
क्रिस गेल - 7
सलमान बट्ट - 7
महेला जयवर्धने - 6
टार्गेटचा पाठलाग करताना सर्वात जास्त विनिंग सेंच्युरी लगावणारे फलंदाज
विराट कोहली - 9
सचिन तेंडुलकर - 6
वीरेंद्र सहवाग - 4
क्रिस गेल - 4
6/6