रक्षाबंधन : स्पेशल... VERY VERY स्पेशल!

 स्पेशल... VERY VERY स्पेशल!

Aug 25, 2015, 13:23 PM IST
1/6

जेवण बनवा स्पेशल
तुम्हाला काही बनवता येत नसलं तरी या दिवशी खास तिच्यासाठी एकदा तरी नक्की प्रयत्न करून पाहा... तुम्हाला नक्कीच काहीतरी स्पेशल पदार्थ बनवता येईल... आणि तुमच्या बहिणीला खूशही करता येईल.... आणि पदार्थ चांगला झाला नाही तर तुमचं प्रेम तिच्यासाठी हा पदार्थ नक्कीच 'यम्मी' बनवेल... ट्राय करा... 

2/6

जुन्या फोटोंचा अल्बम बनवून आठवणींना द्या उजाळा
तुमच्याकडे नक्कीच तुमच्या लहाणपणीचे फोटो असतील... तेच क्षण पुन्हा एकदा जगा... तिच्यासोबत... तुम्ही तुमच्या भावंडांसोबत मजेत, मस्तीत घालवलेले क्षण फोटोंच्या माध्यमातून त्यांच्यासोबत शेअर करा. हे एक छानसं गिफ्ट असू शकतं. 

3/6

एखादं छानसं गाणं म्हणून दाखवा
तुम्ही भलेही बाथरूम सिंगर असाल... भसाड्या आवाजात गाणं गात असाल... तरीही तिला मात्र तिच्यासाठी तुम्ही म्हटलेलं स्पेशल गाणं नक्कीच आवडेल. एखाद्या मुलीच्या आयुष्यात आलेले पहिले पुरुष म्हणजे तिचे वडील आणि भाऊ... मग, भाऊ म्हणून हा दिवस तिच्यासाठी बनवा स्पेशल.... खूप खूप स्पेशल... जशी ती तुमच्यासाठी आहे.

4/6

तिच्या माथ्याचं चुंबन घ्या
आपलं प्रेम आणि काळजी दर्शवण्यासाठी यापेक्षा आणखी दुसरा कोणता चांगला मार्ग असू शकतो... आपल्या बहिणीला वडिलांच्या मायेनं जवळ घेऊन 'मी नेहमीच तुझ्या जवळ असेन' हे सांगण्याचा हा  दुसरा मार्ग समजा...

5/6

तुमच्या भावना पत्रांतून तिच्यापर्यंत पोहचवा
सध्याच्या जगात आपण आपल्या भावा-बहिणींसोबतही व्हॉटसअपवर चॅटिंग करत असतो... आपल्या भावना दर्शवण्यासाठी तर इमोजींचा वापर ठरलेलाच... पण, थोडं आणखी मोकळं व्हा... तिच्यासमोर आपलं मन मोकळं करा... तिच्याबद्दल तुम्हाला किती आदर आहे, किती प्रेम आहे हे तिला पत्रं लिहून सांगा...

6/6

'रक्षाबंधन'... केवळ सण नाही तर भावा-बहिणीच्या नात्याची वीण आणखीनच घट्ट करणारा हा क्षण... बऱ्याचदा आपले भाऊ-बहिण आपल्यासोबत असतील तेव्हा त्यांना आपण गृहित धरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो... मात्र जेव्हा ते आपल्याजवळ नसतात तेव्हा मात्र त्यांची आठवण आपल्याला हैराण करून सोडते... या सणाच्या निमित्तानं का होईना पण आपल्याला हेही नातं गृहीत धरता येणार नाही, याची जाणीव करून देतं.

त्यामुळे, तुम्हालाही बहिण असेल तर तुम्ही तिचा हा दिवस कसा स्पेशल करू शकता याबद्दल आम्ही देतोय काही छोट्या छोट्या पण 'ती'ला खूप मोठा आनंद देणाऱ्या टिप्स... 

'रक्षाबंधन'... केवळ सण नाही तर भावा-बहिणीच्या नात्याची वीण आणखीनच घट्ट करणारा हा क्षण... बऱ्याचदा आपले भाऊ-बहिण आपल्यासोबत असतील तेव्हा त्यांना आपण गृहित धरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो... मात्र जेव्हा ते आपल्याजवळ नसतात तेव्हा मात्र त्यांची आठवण आपल्याला हैराण करून सोडते... या सणाच्या निमित्तानं का होईना पण आपल्याला हेही नातं गृहीत धरता येणार नाही, याची जाणीव करून देतं. त्यामुळे, तुम्हालाही बहिण असेल तर तुम्ही तिचा हा दिवस कसा स्पेशल करू शकता याबद्दल आम्ही देतोय काही छोट्या छोट्या पण 'ती'ला खूप मोठा आनंद देणाऱ्या टिप्स...