तुमच्याही पोटाचा घेर कमीच होत नाहीय...?

Jun 11, 2016, 12:32 PM IST
1/7

दीर्घकाळ तणावाखाली राहणं

अनेक जणांना तणाव जाणवतो... पण, दीर्घकाळ तणावाखाली राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्मोन्समुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावरही जाणवतो. त्यामुळे शरीरात फॅटसही संख्या वाढते... आणि पोटाचा घेर मोठा मोठा होत जातो... त्यामुळे, तणाव असेल तरी तो सहजपणे घेण्याचा प्रयत्न करा आणि खळखळून हसा... 

दीर्घकाळ तणावाखाली राहणं अनेक जणांना तणाव जाणवतो... पण, दीर्घकाळ तणावाखाली राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्मोन्समुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावरही जाणवतो. त्यामुळे शरीरात फॅटसही संख्या वाढते... आणि पोटाचा घेर मोठा मोठा होत जातो... त्यामुळे, तणाव असेल तरी तो सहजपणे घेण्याचा प्रयत्न करा आणि खळखळून हसा... 

2/7

पुरेशी झोप न मिळणं...

पुरेशी झोप न मिळाल्यानं भुकेला उत्तेजित करणारं ग्रेलिन नावाचं हार्मोन तुमच्या शरीरात तयार होतं. त्यामुळे, तुमच्या पोटावर नक्कीच परिणाम जाणवेल. 

पुरेशी झोप न मिळणं... पुरेशी झोप न मिळाल्यानं भुकेला उत्तेजित करणारं ग्रेलिन नावाचं हार्मोन तुमच्या शरीरात तयार होतं. त्यामुळे, तुमच्या पोटावर नक्कीच परिणाम जाणवेल. 

3/7

उशीरा जेवणं

रात्री उशीरा जेवणं... आणि जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं... यासारखी दुसरी वाईट सवय नाही. तुमच्या शरीरासाठी ही अत्यंत घातक सवय आहे. खाल्यानंतर लगेचच झोपल्यानं तुमच्या शरीरातील फॅटस् जास्त प्रमाणात वाढतात. तुम्ही अॅक्टीव्ह असताना घेतलेला पोषक आहार कॅलरीज लवकर बर्न करू शकतो... त्यानंतर तुम्ही आरामात झोपू शकता. 

उशीरा जेवणं रात्री उशीरा जेवणं... आणि जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं... यासारखी दुसरी वाईट सवय नाही. तुमच्या शरीरासाठी ही अत्यंत घातक सवय आहे. खाल्यानंतर लगेचच झोपल्यानं तुमच्या शरीरातील फॅटस् जास्त प्रमाणात वाढतात. तुम्ही अॅक्टीव्ह असताना घेतलेला पोषक आहार कॅलरीज लवकर बर्न करू शकतो... त्यानंतर तुम्ही आरामात झोपू शकता. 

4/7

अल्कोहोलचं जास्त प्रमाणात

तुमच्या पोटाच्या वाढलेल्या घेरामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण असू शकतं. यामुळे तुम्हाला सारखं भूक लागल्यासारखं वाटून तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाऊ शकता. 

अल्कोहोलचं जास्त प्रमाणात तुमच्या पोटाच्या वाढलेल्या घेरामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण असू शकतं. यामुळे तुम्हाला सारखं भूक लागल्यासारखं वाटून तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाऊ शकता. 

5/7

जास्त प्रमाणात सोडा पिणं

तुम्हीही तुमच्या सगळ्या डाएटवर सोडा फिरवत असाल... म्हणजेच, जास्त सोडा मिश्रित पेय पित असाल तर त्याचा परिणाम तर तुम्हाला भोगावाच लागेल. कार्बनमिश्रित पेयांमुळे तुम्हाला खाण्याची इच्छा जास्त होते.

जास्त प्रमाणात सोडा पिणं तुम्हीही तुमच्या सगळ्या डाएटवर सोडा फिरवत असाल... म्हणजेच, जास्त सोडा मिश्रित पेय पित असाल तर त्याचा परिणाम तर तुम्हाला भोगावाच लागेल. कार्बनमिश्रित पेयांमुळे तुम्हाला खाण्याची इच्छा जास्त होते.

6/7

न्याहारी टाळणं

जास्त खायचं नाही म्हणून तुम्ही न्याहारी म्हणजेच तुमचा सकाळचा नाश्ता टाळत असाल तर मोठी चूक करताय. दिवसाची सुरुवात तुमच्या पौष्टीक अन्नाने व्हायला हवी. नाश्ता टाळल्यानं तुमची चयापचयाची गती मंदावते. 

न्याहारी टाळणं जास्त खायचं नाही म्हणून तुम्ही न्याहारी म्हणजेच तुमचा सकाळचा नाश्ता टाळत असाल तर मोठी चूक करताय. दिवसाची सुरुवात तुमच्या पौष्टीक अन्नाने व्हायला हवी. नाश्ता टाळल्यानं तुमची चयापचयाची गती मंदावते. 

7/7

तुम्ही नियमितपणे व्यायाम करता, योग्य तो आहार घ्यायचा प्रयत्न करताय... परंतु, तुमच्या पोटाचा वाढलेला घेर मात्र काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय... असं तुम्हालाही वाटतंय का?

असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कुठे तरी चुकतंय... तुमच्या पोटावर वाढलेल्या चरबीमुळे अर्थातच तुमचंही वजनही तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. तसंच हृदयाचे, उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वासोच्छवासात अडथळे असे अनेक आजार यामुळे वाढीसही लागतात. 

मग, सगळे प्रयत्न करूनही नक्की चुकतंय कुठे... चला पाहुयात... 

तुम्ही नियमितपणे व्यायाम करता, योग्य तो आहार घ्यायचा प्रयत्न करताय... परंतु, तुमच्या पोटाचा वाढलेला घेर मात्र काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय... असं तुम्हालाही वाटतंय का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कुठे तरी चुकतंय... तुमच्या पोटावर वाढलेल्या चरबीमुळे अर्थातच तुमचंही वजनही तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. तसंच हृदयाचे, उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वासोच्छवासात अडथळे असे अनेक आजार यामुळे वाढीसही लागतात.  मग, सगळे प्रयत्न करूनही नक्की चुकतंय कुठे... चला पाहुयात...