Todays Panchang : पंचांग सांगतंय आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा, आताच पाहून घ्या

Todays Panchang : हिंदू पंचांगातून अनेक गोष्टींची माहिती मिळते. या पंचांगाची आणखी एक ओळख म्हणजे वेदिक पंचांग. जिथं काळ आणि वेळेची गणना केलेली असते.   

Updated: Mar 20, 2023, 06:34 AM IST
Todays Panchang : पंचांग सांगतंय आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा, आताच पाहून घ्या  title=
20 march 2023 Monday todays panchang mahurat astro news

Todays Panchang : एका नव्या आठवड्याची सुरुवात झाली असून 2023 मधील तिसऱ्या महिन्यातील शेवटचे 10 दिवस उरले आहेत. हा हा म्हणता नव्या वर्षाचे तीन महिनेसुद्धा उलटले, या विचारानंच तुम्ही आश्चर्यचकित होत आहात ना? तुमच्यापैकी काही मंडळी ताटकळलेली शुभकार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी तर यासाठी आजचाच दिवस योग्यही समजला आहे. पण, कोणतंही कार्य हाती घेण्याआधी पाहून घ्या आजचं पंचांग. 

राशीभविष्याइतकंच महत्त्वं दैनंदिन पंचांगाला द्या. इथं तुम्हाला अशुभ काळ, शुभ योगासंबंधीची माहिती मिळेल. चला तर, पाहूया आजचं पंचांग. (20 march 2023 Monday todays panchang mahurat astro news)

आजचा वार - सोमवार    
तिथी- चतुर्दशी
नक्षत्र - शतभिष
योग - साघ्य  
करण- बालव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:25 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.32 वाजता
चंद्रोदय -  दुपारी 06.14 वाजता  
चंद्रास्त - सकाळी 05:07 वाजता  
चंद्र रास- कुंभ     

आजचा अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 12:53:13 पासुन 13:41:38 पर्यंत, 15:18:28 पासुन 16:06:54 पर्यंत
कुलिक– 15:18:28 पासुन 16:06:54 पर्यंत
कंटक– 08:51:06 पासुन 09:39:32 पर्यंत
राहु काळ– 07:56:38 पासुन 09:27:25 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 20 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत नवी जबाबदारी मिळेल!

 

कालवेला/अर्द्धयाम– 10:27:57 पासुन 11:16:22 पर्यंत
यमघण्ट–12:04:47 पासुन 12:53:13 पर्यंत
यमगण्ड– 10:58:13 पासुन 12:29:00 पर्यंत
गुलिक काळ–  13:59:47 पासुन 15:30:35 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:04:47 पासुन 12:53:13 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ

चंद्रबल- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)