ग्रहांच्या युतीमुळे 59 वर्षानंतर 5 अद्भुत राजयोग, पाच राशींवर दिसणार सकारात्मक प्रभाव

प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात.

Updated: Sep 19, 2022, 12:42 PM IST
ग्रहांच्या युतीमुळे 59 वर्षानंतर 5 अद्भुत राजयोग, पाच राशींवर दिसणार सकारात्मक प्रभाव  title=

Grah Gochar September 2022: ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि गोचर यावरून भाकीतं केली जातात. त्यामुळे ज्योतिष्यांच्या मते ग्रहांचा गोचर महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. यावर्षी 24 सप्टेंबर रोजी ग्रहांची स्थिती आश्चर्यकारक असणार आहे. एकाच वेळी 5 शक्तिशाली राजयोग तयार होत आहेत. राजयोग बनण्याचा हा अद्भुत योगायोग 59 वर्षांनंतर घडणार आहे. या दिवशी शनि, बुध आणि गुरू वक्री असतील. याशिवाय सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य योग आणि शुक्राच्या गोचरामुळे दुर्बल राजयोग तयार होईल.  दोन प्रकारचे भंग राजयोग, बुधादित्य, भ्रद आणि हंस तयार होत आहेत. या 5 राजयोगांचा 5 राशींवर शुभ प्रभाव पडेल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना हे राजयोग लाभदायक ठरतील. व्यवसायात भरपूर फायदा होईल. शनिशी संबंधित गोष्टींच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

मिथुन : करिअर, व्यवसायात यश आणि धनलाभ होईल. राजकारण्यांना मोठी पदे मिळू शकतात. इच्छित ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळेल.

कन्या : व्यवसायात मोठे यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. मीडिया, फिल्मी जगताशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागतील. भाग्य तुम्हाला साथ देईल.

धनु : व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहील. नवीन करार अंतिम होऊ शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो, ज्यामुळे खूप फायदा होईल. धनलाभ होईल.

मीन : हा काळ सर्वच बाबतीत चांगला राहील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)