Angarak Yoga In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी 23 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश केला आहे. मुख्यम म्हणजे राहू ग्रह आधीच स्थित आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगामुळे अशुभ अंगारक योग तयार बनतोय.
ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात. यावेळी या लोकांना आर्थिक नुकसान आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
अंगारक योग तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील काही बाबींवर एकमत होणार नाही. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून तणाव असू शकतो. यावेळी तुम्ही खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी. या काळात तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणं उत्तम राहील. या राशीच्या लोकांना प्रत्येक प्रयत्नात अपयशाचा सामना करावा लागू शकतो.
तूळ राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. तुमचं कोणतंही पोलीस किंवा कोर्ट केस चालू असल्यास तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला पाठदुखी आणि अल्सरसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात नशीब पूर्ण साथ देणार नाही. अनेक चांगल्या संधी तुमच्या हातून निसटू शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती धोकादायक ठरू शकते. या काळात काही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. यावेळी कोणतेही नवीन काम करणं टाळा. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडा वेळ थांबा. यावेळी तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )