Five Rajyog In Transit Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका निश्चित अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. आता सुमारे 700 वर्षांनंतर 5 राजयोगाचा योगायोग होत आहे.
29 नोव्हेंबरला दानव गुरु शुक्राचार्य आणि गुरु बृहस्पती आमनेसामने आले आहेत. या 29 नोव्हेंबरपासून 5 राजयोग तयार झाले आहेत. ज्यामध्ये शश, केंद्र त्रिकोण, मालव्य, नवपंचम, रूचक राजयोग राजयोग तयार झाले आहेत. यामुळे 4 राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया या 5 राजयोगांमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत.
5 राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहेत. यावेळी केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्ही परदेशात जाऊ शकता. वैवाहिक जीवनातही गोडवा राहणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकणार आहेत.
पाच राजयोग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना अनुकूल राहणार आहे. यावेळी, ज्या लोकांनी आपली नोकरी गमावली आहे, त्यांना ते मिळू शकते. नोकरदारांना वेतनवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
5 राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला परदेशातून लाभ मिळतील. परदेशातही नोकरी मिळू शकते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकता. शनी आणि शुक्राचा नवपंचम योग तयार झाला आहे. यासोबतच गुरू आणि शुक्राचा समसप्तक योग झाला असून तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
पाच राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. याचा अर्थ तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. यावेळी तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तसेच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )