Amla Navami 2023 : आवळा नवमीला शनि शश योग व शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Amla Navami 2023 Shubh Yog : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळा नवमी किंवा अक्षया नवमी साजरी करण्यात येते. आंवला नवमीला शनि शश योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींचं भविष्य उजळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 21, 2023, 12:05 AM IST
Amla Navami 2023 : आवळा नवमीला शनि शश योग व शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना title=
amla navami 2023 shubh yog shani shash yog and shatbhisha nakshatra These zodiac signs will get Kubera treasure muhurta puja importance Akshay Navami

Amla Navami 2023 /Akshay Navami 2023 : आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी साजरी करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी दान आणि धर्माला विशेष महत्त्व असतं. आजच्या दिवशी दान केल्यामुळे पाप नष्ट होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे. आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यात येते. आज आवला नवमीला शनि शश योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. (amla navami 2023 shubh yog shani shash yog and shatbhisha nakshatra These zodiac signs will get Kubera treasure muhurta puja importance Akshay Navami)

आंवला नवमी तिथी आणि शुभू मुहूर्त! 

पंचांगानुसार नवमी तिथी 21 नोव्हेंबरला पहाटे 3.15 मिनिटापासून 22 नोव्हेंबरला रात्री 1.07 मिनिटापर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार आंवला नवमी 21 नोव्हेंबर 2023 ला साजरा करण्यात येणार आहे. 
आंवला नवमी पूजा शुभ मुहूर्त - सकाळी 6.47 वाजेपासून दुपारी 12.06 वाजेपर्यंत 

आंवला नवमी शुभ योग!

पंचांगानुसार नवमीला रवि योग आणि हर्षण योग जुळून आला आहे. रवि योग 21 नोव्हेंबरला रात्री 8.02 मिनिटापासून 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.48 मिनिटापर्यंत आहे. तर हर्षण योग दिवसभर असणार आहे. चंद्र शनीच्या मूत्र त्रिकोण राशीत कुंभ राशीत प्रवेश केल्यामुळे शनि षष्ठ योग तयार झाला आहे. शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोगही जुळून आला आहे. 

आवळा नवमीचे महत्त्व  

आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करण्यात येतं. आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णूने कुष्मांडक राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. तर याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी तीन वनांची परिक्रमा केली होती असं पौराणिक कथेत सांगण्यात आलं आहे. आजही लोक अक्षय नवमीला मथुरा-वृंदावन प्रदक्षिणा घालतात. संतती प्राप्तीसाठी नवमीची पूजा केली जाते. 

आवळा नवमी पूजा विधी 

आवळा नवमीच्या दिवशी महिलांनी आंघोळ वगैरे करून कोणत्याही आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळा झाडाच्या मुळाशी शुद्ध पाणी अर्पण करावं. त्यानंतर कच्चे दूध अर्पण करावं. आता ओवळ्याचा देठावर कच्चा कापूस किंवा मोली गुंडाळत 8 प्रदक्षिणा घालाव्यात. काही ठिकाणी 108 प्रदक्षिणाही करण्याची परंपरा आहे. यानंतर झाडाखाली बसून कुटुंब आणि मित्रांसह भोजन करावं. 

वृषभ रास 

या लोकांसाठी हा योग खूप शुभ ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगल स्थळ येणार आहे. आवळा नवमीच्या मुहूर्तावर तुम्ही नवीन वाहन किंवा कोणतीही चैनीची वस्तू खरेदीची योग आहेत.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी आवळा नवमी शुभ ठरणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार असून गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होणार आहे. लव्ह लाईफमध्ये असलेल्या लोकांसाठी हा योग चांगला सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमच्या योजनेतून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. 

सिंह रास 

या राशीसाठी आवळा नवमी भाग्यशाली ठरणार आहे. सामाजिक वर्तुळात तुमचं नाव होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ मिळणार आहे. तुमची अनेक कामं पूर्ण होणार असून तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळणार आहे. 

कन्या रास 

या राशीच्या लोकांसाठी हा योग चांगला असणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा प्राप्त होणार आहे. आयुष्यात सकारात्मक दिवस घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांच्या कामाचं कौतुक होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

कुंभ रास 

शनि षष्ठ योगामुळे या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि चंद्र देखील तुमच्या राशीत भ्रमण असल्याने करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला नवीन वाहन, सोने-चांदी खरेदी करण्याचे योग आहेत. कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)